कुत्रा आणि माणसाची मैत्री कशी होते? तो आपल्याला क्यूट का वाटतो? 99 टक्के लोकांना माहित नसेल यामागचं कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
लांडगे (Wolves), आगीजवळ बसलेल्या मानवी वस्त्या आणि एका अशा विश्वासाची, ज्याने संपूर्ण जगाचा इतिहास बदलून टाकला. चला, तर मग जाणून घेऊया, माणूस आणि कुत्र्याच्या या जिव्हाळ्याच्या नात्याची सुरुवात नेमकी कशी झाली.
आपल्यापैकी अनेकांना पाळीव कुत्रे (Dogs) आवडतात. कुत्र्याला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू येते आणि त्यांच्या निष्पाप डोळ्यांमध्ये पाहिलं की लोकांचे मन लगेच पिघळते. काही कुत्रे तर स्वत:हून प्रेमाने माणसाकडे येतात. तर काही कुत्रे सहजच एखाद्या व्यक्तीच्या मागून मागून जातात. कधी विचार केला आहे का, की हे प्राणी माणसांना इतक्या सहजपणे कसे स्विकारतात किंवा भरोसा ठेवतात? माणूस आणि कुत्रा या दोन प्रजातींमधील हे नाते आजचे नाही, तर ते हजारो वर्षांपूर्वीचे आहे आणि या मैत्रीच्या जन्मामागे एक रंजक आणि रहस्यमय कहाणी दडलेली आहे.
advertisement
advertisement
advertisement
यामागे वैज्ञानिक दोन प्रमुख सिद्धांत आहेतसिद्धांत 1: मानवाने पाळले लहान लांडगेयानुसार, प्राचीन मानवाने शिकारीसाठी लहान आणि कमी आक्रमक लांडग्यांच्या पिलांना पकडून पाळण्यास सुरुवात केली. हळूहळू हे लांडगे त्यांच्या जंगली सवयी विसरले आणि माणसांसोबत मिसळून गेले. शिकार करण्यात मदत, वस्तीची सुरक्षा आणि मानसिक सोबत... यातून हे नाते अधिकाधिक मजबूत होत गेले.
advertisement
advertisement
लांडग्यांना: सहज उपलब्ध होणारे अन्न मिळाले.मानवांना: लांडग्यांकडून त्यांच्या वस्तीला नैसर्गिकरीत्या पहारा (चौकसी) मिळू लागला.ज्या लांडग्यांना माणसांची भीती कमी वाटत होती, तेच जिवंत राहिले आणि त्यांची प्रजनन क्षमता वाढली. याच नैसर्गिक निवडीतून त्यांची उत्क्रांती होत गेली आणि ते कुत्र्यांची पहिली पिढी बनले.
advertisement
कुत्रे इतके 'क्यूट' का वाटतात?कुत्रे माणसांना इतके आवडतात कारण त्यांनी केवळ शारीरिक नव्हे, तर भावनात्मक पातळीवरही स्वतःला जुळवून घेतले आहे. प्रोफेसर लार्सन यांच्या म्हणण्यानुसार, कुत्र्यांनी खास चेहऱ्याचे स्नायू विकसित केले आहेत. ज्यामुळे ते लहान मुलांसारखे निष्पाप हावभाव देतात. 2019 च्या एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, त्यांच्या डोळ्यांच्या वर असलेले स्नायू (Brow Muscles) हे माणसाचे मन जिंकण्याचा त्यांचा एक जैविक (Biological) मार्ग आहे.
advertisement
एमोरी युनिव्हर्सिटीच्या (Emory University) एका महत्त्वपूर्ण अभ्यासानुसार, जेव्हा कुत्र्यांना त्यांच्या 'आपल्या' माणसाचा वास (Smell) येतो, तेव्हा त्यांच्या मेंदूतील 'सकारात्मक भावना' (Positive Emotion) संबंधित भाग सर्वाधिक सक्रिय होतो. याचा अर्थ असा की, हे नाते केवळ प्रेम आणि सोबतीचे नाही, तर एकमेकांच्या अस्तित्वाला शारीरिक आणि रासायनिक पातळीवर 'अनुभवण्याची' क्षमता या नात्यात आहे.


