Post Office FD मध्ये गुंतवणूक करायचीये? घरबसल्या होईल काम, ही आहे प्रोसेस
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्हाला बँकेत FD वगैरे गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ते ऑनलाइन करू शकता. त्यासाठी बँकेत जाऊन गुंतवणूक करणे आवश्यक नाही. चला याची प्रोसेस जाणून घेऊया...
मुंबई : बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी, एफडी, पीपीएफ आणि इतर अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगल्या व्याजदराचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला बँकेत एफडी वगैरे करायची असेल तर तुम्ही ते ऑनलाइन करू शकता. त्यासाठी बँकेत जाऊन गुंतवणूक करणे आवश्यक नाही. पण तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हे घरी बसून करता येईल का? लोकांना याबाबत फारशी माहिती नाही. पोस्ट ऑफिसमध्येही तुम्हाला सर्व कामे ऑनलाइन करण्याची सुविधा दिली जाते. या सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही घरबसल्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट उघडू शकता. कसे ते येथे समजून घ्या-
अशा प्रकारे ऑनलाइन अकाउंट उघडा
-पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट उघडण्याची सुविधा इंट्रा ऑपरेटेबल नेटबँकिंग/मोबाइल बँकिंगद्वारे प्रदान केली जाते.
-यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड युझर आयडी आणि पासवर्ड वापरून पोस्ट ऑफिस ई-बँकिंग (https://ebanking.indiapost.gov.in) वर लॉग इन करावे लागेल.
advertisement
-यानंतर, 'जनरल सर्व्हिसेस' ऑप्शनवर जा आणि टाइम डिपॉझिट अकाउंट उघडण्यासाठी अर्ज करा.
दरम्यान तुम्हाला काही दस्तावेज अपलोड करण्याची गरज पडेल. जसं की, अॅक्टिव्ह सेव्हिंग अकाउंट, पॅन कार्ड, केवायसी डॉक्यूमेंट्स, अॅक्टिव्ह DOP ATM किंवा डेबिट कार्ड आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी. अर्जाच्या सर्व प्रक्रियेचे पालन करा. दिलेली माहिती व्हेरिफाय केल्यानंतर तुमचं अकाउंट ओपन केलं जाईल.
advertisement
1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी FD सुविधा
पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी एफडी सुविधा दिली जाते. सर्वांचे व्याजदर देखील कार्यकाळानुसार वेगवेगळे असतात. सध्या एका वर्षाच्या एफडीवर 6.9%, दोन वर्षांच्या एफडीवर 7.0%, तीन वर्षांच्या एफडीवर 7.1%, 5 वर्षांच्या एफडीवर 7.5% व्याज दिले जात आहे. यामध्ये गुंतवणूक 1,000 रुपयांपासून सुरू करता येते, जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2024 12:06 PM IST