Share Marketमध्ये नवा गेमचेंजर, पैसे दुप्पट करणाऱ्या 15 ‘हॉट शेअर्स’ची यादी; सेव्ह करून ठेवा ही List

Last Updated:

Share Market Prediction: ब्रोकरेज हाउस Axis Securities ने गुंतवणूकदारांसाठी 15 दमदार शेअर्सची यादी जाहीर केली आहे. या कंपन्यांमध्ये 32% पर्यंत नफा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, टेलिकॉमपासून बँकिंग, हेल्थकेअर आणि ऑटोपर्यंत सर्व क्षेत्रांचा समावेश आहे.

News18
News18
मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी कमाईची नवी संधी आली आहे. ब्रोकरेज हाउस Axis Securities ने 15 निवडक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉक्समधून कमाल 32% पर्यंत नफा (रिटर्न) मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
advertisement
या यादीत टेलिकॉम, बँकिंग, हेल्थकेअर, रिअल इस्टेट आणि ऑटो अशा विविध क्षेत्रांतील दिग्गज कंपन्या आहेत.
Bharti Airtel
Axis Securities ने या टेलिकॉम दिग्गज कंपनीसाठी 2,300 चे टार्गेट दिले आहे, म्हणजेच सुमारे 22% वाढीची शक्यता आहे. ब्रोकरेजनुसार वाढता सबस्क्राइबर बेस, 4G कन्वर्जनचा वेग आणि उच्च नफा मार्जिन हे कंपनीच्या वाढीचे प्रमुख घटक आहेत.
advertisement
Max Healthcare
या हॉस्पिटल चेनवर सर्वाधिक विश्वास दाखवत Axis Securities ने 1,450 चे टार्गेट दिले आहे म्हणजेच 30% वाढीची अपेक्षा.कंपनीचे लक्ष ऑन्कोलॉजी आणि आंतरराष्ट्रीय रुग्ण व्यवसायावर आहे. तसेच मजबूत रिटर्न रेशोमुळे ही कंपनी गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरत आहे.
advertisement
HDFC Bank
भारताचा सर्वात मोठा खाजगी बँकिंग खेळाडू HDFC Bank साठी ब्रोकरेजने 1,150 चे टार्गेट दिले आहे, म्हणजेच 21% अपसाइड.नेट इंटरेस्ट मार्जिनवर थोडा दबाव राहील. पण मजबूत फी इनकम, नियंत्रित खर्च आणि उत्तम एसेट क्वालिटी यामुळे बँक चांगली कामगिरी ठेवेल, असा अंदाज आहे.
advertisement
Prestige Estates
या रिअल इस्टेट कंपनीत 32% पर्यंत वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.Axis Securities ने 2,000 चे टार्गेट ठेवले आहे. FY26 साठी कंपनीने 27,000 कोटींच्या प्री-सेल्स आणि 43,000 कोटींच्या लॉन्च पाइपलाइनचे उद्दिष्ट ठेवले आहे. NCR मार्केटमधील दमदार परफॉर्मन्स ही मोठी ताकद आहे.
advertisement
Lupin
फार्मा क्षेत्रातील Lupin साठी 2,400 चे टार्गेट दिले आहे, म्हणजेच 26% वाढीची अपेक्षा. सध्या कंपनी FY26 आणि FY27 च्या अपेक्षित कमाईच्या अनुक्रमे 23.5x आणि 21.5x व्हॅल्यूएशनवर ट्रेड करत आहे.
Bajaj Finance
advertisement
या NBFC कंपनीसाठी 1,100 चे टार्गेट निश्चित केले आहे, म्हणजेच 10% वाढीची शक्यता. कमी व्याजदर, उत्तम बॉरोइंग मिक्स आणि फंडची किंमत कमी झाल्याने मार्जिन सुधारण्यास मदत होईल. मात्र, नवीन सेगमेंट्समधील एसेट क्वालिटीची जोखीम कायम आहे.
State Bank of India (SBI)
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेत 17% अपसाइडची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ब्रोकरेजने 1,025 चे टार्गेट ठेवले आहे. SBI चे मजबूत लिक्विडिटी रेशो आणि क्रेडिट ग्रोथमधील गती यामुळे बँकेला फायदा होईल.
Avenue Supermarts (DMart)
या रिटेल दिग्गज कंपनीसाठी 5,280 चे टार्गेट ठरवले आहे, म्हणजेच 18% वाढीची शक्यता. त्योहारी हंगाम, स्थिर अर्थव्यवस्था आणि अपॅरल व जनरल मर्चेंडाइज कॅटेगरीतील मजबूत मार्जिन यामुळे कंपनीची वाढ सुरू राहील.
Hero MotoCorp
टू-व्हीलर क्षेत्रातील आघाडीची कंपनी Hero MotoCorp साठी 6,245 चे टार्गेट आहे, म्हणजेच 14% वाढीची शक्यता. ग्रामीण उत्पन्नात वाढ, लग्नाचा हंगाम आणि डिस्पोजेबल इनकम वाढल्याने टू-व्हीलर विक्रीत वाढ अपेक्षित आहे.
Shriram Finance
या NBFC साठी ब्रोकरेजने 750 चे टार्गेट दिले आहे, म्हणजेच 22% अपसाइड. ग्रामीण बाजारपेठांमधील मजबूत मागणी आणि विविध सेगमेंट्समधील चांगली वाढ यामुळे कंपनी मध्यम अवधीत 15% CAGR AUM ग्रोथ साधू शकते.
Mahanagar Gas (MGL)
या गॅस वितरण कंपनीच्या शेअर्समध्ये 19% वाढीची शक्यता आहे. ब्रोकरेजने 1,540 चे टार्गेट दिले असून, DCF व्हॅल्यूएशनमध्ये 11.6% वेटेड एवरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल आणि 3% टर्मिनल ग्रोथ रेट गृहीत धरले आहे.
Kirloskar Brothers
Axis Securities ने या कंपनीसाठी 2,330 चे टार्गेट दिले आहे, म्हणजेच 21% अपसाइड. महत्त्वाच्या बाजारांतील सतत वाढती मागणी आणि मजबूत ऑर्डर बुकमुळे कंपनीला मध्यम अवधीत दुहेरी अंकातील रेव्हेन्यू ग्रोथ मिळू शकते.
Sansera Engineering
या कंपनीसाठी 1,580 चे टार्गेट आहे, म्हणजेच 15% वाढीची शक्यता. FY26-28 दरम्यान कंपनीचे रेव्हेन्यू, EBITDA आणि PAT अनुक्रमे 10%, 12% आणि 18% CAGR ने वाढतील, असा अंदाज ब्रोकरेजने वर्तवला आहे.
Kalpataru Projects International
या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये 17% पर्यंत वाढीची शक्यता. 1,470 चे टार्गेट ठेवले असून, कंपनीची मजबूत ऑर्डर बुक, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय T&D B&F सेगमेंटमधील संधी आणि सरकारी धोरणांचा फायदा यामुळे ग्रोथ मजबूत राहील.
APL Apollo Tubes
Axis Securities ने या स्टील ट्यूब उत्पादक कंपनीसाठी 1,686 चे टार्गेट दिले आहे, म्हणजेच 16% अपसाइड. इन्फ्रास्ट्रक्चर बूमचा फायदा घेण्यासाठी कंपनी उत्तम स्थितीत आहे आणि तिचे ग्रोथ ड्रायव्हर्स मजबूत आहेत.
Disclaimer: वरील माहिती तज्ञांनी व्यक्त केलेले विचार आणि गुंतवणूक टिप्स त्यांचे स्वतःचे आहेत. वेबसाइट किंवा तिच्या व्यवस्थापनाचे नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
मराठी बातम्या/मनी/
Share Marketमध्ये नवा गेमचेंजर, पैसे दुप्पट करणाऱ्या 15 ‘हॉट शेअर्स’ची यादी; सेव्ह करून ठेवा ही List
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement