शेअर बाजारात मोठा गेम! या 9 शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर, ही संधी सोडू नका!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारतीय शेअर बाजारात पुढील आठवड्यात डिव्हिडंड, बोनस, स्टॉक स्प्लिट आणि राइट इश्यूमुळे HUDCO, Bharat Electronics, GR Infraprojects, SBC Exports, Vipul Organics हे शेअर्स चर्चेत असतील.
मुंबई: भारतीय शेअर बाजार पुढील आठवड्यात मोठ्या आर्थिक घडामोडींचा साक्षीदार ठरणार आहे. डिव्हिडंड, बोनस, स्टॉक स्प्लिट आणि राइट इश्यू यांसारख्या महत्त्वाच्या कॉर्पोरेट हालचालींमुळे गुंतवणूकदारांची नजर 9 प्रमुख शेअर्सवर राहणार आहे.
हे 9 शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे का?
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार पुढील आठवड्यात चर्चेत असणाऱ्या कंपन्यांमध्ये Housing & Urban Development Corporation (HUDCO), Bharat Electronics, GR Infraprojects, SBC Exports, Vipul Organics, IOHL Chemicals & Pharmaceuticals, Mehta Technology, Shalimar Agency आणि Sangar Decor यांचा समावेश आहे.
advertisement
डिव्हिडंड देणारे शेअर्स
भारत इलेक्ट्रॉनिक्सने प्रति शेअर 1.50 रुपया डिव्हिडंड जाहीर केला असून त्याची रेकॉर्ड डेट 11 मार्च आहे. HUDCO बोर्ड 11 मार्चला दुसऱ्या अंतरिम डिव्हिडंडवर चर्चा करणार आहे, तर GR Infra Projects 7 मार्चला बैठक घेणार आहे. जर डिव्हिडंड मंजूर झाला, तर त्याची रेकॉर्ड डेट 13 मार्च असेल.
स्टॉक स्प्लिट – शेअर्स स्वस्त दरात मिळणार
स्टॉक स्प्लिटमुळे गुंतवणूकदारांना कमी किमतीत जास्त शेअर्स घेण्याची संधी मिळते. पुढील आठवड्यात IOHL Chemicals, Mehta Technology, Shalimar Agency आणि Sangar Decor स्टॉक स्प्लिट करणार आहेत.
advertisement
IOHL Chemicals – 1:5 च्या प्रमाणात स्प्लिट (1 शेअरचे 5 शेअर्स होतील)
Mehta Technology आणि Shalimar Agency – 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट
Sangar Decor – 1:5 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट
राइट आणि बोनस शेअर्स जाहीर
SBC Exportsने 1:2 बोनस इश्यू जाहीर केला आहे, म्हणजे 2 शेअर्सच्या बदल्यात 1 बोनस शेअर मिळणार आहे. Vipul Organicsने 44.37 लाख नवीन शेअर्ससाठी राइट इश्यू आणला आहे, जो 46 रुपया प्रति शेअर दराने विकला जाणार असून त्याची एकूण किंमत 25 कोटी रुपया असेल.
advertisement
गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
हे 9 शेअर्स त्यांच्या कॉर्पोरेट हालचालींमुळे पुढील आठवड्यात मोठ्या चर्चेत असतील. गुंतवणूकदारांनी या संधीचा फायदा घेऊन योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये यापैकी कोणते शेअर्स आहेत? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 15, 2025 10:36 AM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
शेअर बाजारात मोठा गेम! या 9 शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर, ही संधी सोडू नका!