Muhurat Trading: 9 शेअर जे रॉकेटच्या स्पीडनं धावतील, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत का?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
तुमच्या पोर्टफोलियोमध्ये जर हे शेअर्स नसतील तर तुम्ही मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान खरेदी करू शकता.
मुंबई: दिवाळीमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन, या दिवशी खास मुहूर्त ट्रेडिंग केलं जातं. मुहूर्त ट्रेडिंग शुभं मानलं जातं. मुहूर्त ट्रेडिंगला मार्केटही पिकवर असतं. अनेक गुंतवणूकदार या दिवसाची आतूरतेनं वाट पाहात असतात. या दिवशी शेअर्स घेण्यासाठी खास पैसे साठवतात. आज आम्ही तुम्हाला असे काही शेअर्स सांगणार आहोत जे रॉकेटच्या स्पीडने येत्या काळात धावतील. तुमच्या पोर्टफोलियोमध्ये जर हे शेअर्स नसतील तर तुम्ही मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान खरेदी करू शकता.
सलग पाच दिवसांत 2.71 टक्क्यांनी शेअर मार्केट कोसळल्यानंतर गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे निफ्टी 50 दोन दिवसांत 1.18 टक्क्यांनी वधारला होता. यामुळे बाजारात थोडं दिलासादायक वातावरण होतं, पण त्यानंतर दोन दिवसांत 1.07 टक्क्यांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली.
तज्ज्ञांच्या मते, बाजारात पुन्हा एकदा चांगली रिकव्हरी दिसू शकते. काही स्टॉक आहेत ज्यांनी ब्रेकआउट केले आहे, त्यामुळे तुम्ही सध्याच्या पातळीवर पैसे गुंतवून प्रचंड नफा कमवू शकता.
advertisement
सिटी युनियन बँक या स्टॉकची किंमत 175.60 रुपये आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख चंदन टापारिया यांनी मनी कंट्रोलला दिलेल्या वृत्तानुसार (मनी कंट्रोल ही न्यूज18 ची सहयोगी वेबसाईट आहे.) 170 रुपयांच्या स्टॉप लॉससह 187 रुपयांच्या टार्गेटकडे किंमत जाऊ शकते. त्यामुळे हे शेअर घेण्याचा सल्ला दिला आहे.
Laurus Labs या शेअरची किंमत 491.90 या शेअरची टार्गेट प्राइज 518 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. Max Financial Services, Asahi India Glass, IRB Infrastructure Developers, SBI Life Insurance Company, Punjab National Bank, Asahi India Glass या शेअरची किंमत 749.65 रुपये आहे. Vedant Fashions या शेअरची किंमत 1401.10 रुपये आहे, याची टार्गेट प्राइज 1540 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, BEML या शेअरची किंमत 4067.85 रुपये आहेत. तर टार्गेट प्राइज 4490 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे शेअर्स तुम्ही आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2024 3:01 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Muhurat Trading: 9 शेअर जे रॉकेटच्या स्पीडनं धावतील, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत का?