अमेरिकेचे भारतावर गंभीर आरोप, भारत-अमेरिका मैत्री संबंधात मिठाचा खडा पडणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 100% टॅरिफ वॉर सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारत-अमेरिका संबंध ताणले जाऊ शकतात आणि जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई: मागच्या पाच महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये हाहाकार उडाला आहे. तर पुढचे 18 महिने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी संसदेतील भाषणादरम्यान थेट भारतावर निशाणा साधत 100% टॅरिफ वॉर सुरू करण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी दोन वेळा भारताचे नाव घेत भारताच्या टॅरिफ धोरणावर ताशेरे ओढले. हा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम करू शकतो.
यावेळी त्यांनी भारताच्या नावाचा दोनवेळा उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेतून भारतात जाणाऱ्या वस्तूंवर 100% टॅरिफ लावलं जातं. हे अजिबात योग्य नाही. 2 एप्रिलपासून जो देश अमेरिकन आयातीवर टॅरिफ लावेल, त्या बदल्यात अमेरिकाही तितकाच टॅरिफ लावेल असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीपूर्ण संबंधात या टॅरिफमुळे मिठाचा खडा पडणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इतर देशांनी अनेक दशकांपासून अमेरिकेविरोधात टॅरिफचा वापर केला. आता आमची पाळी आहे, ज्या देशांनी आमच्यावर टॅरिफ लावला, त्या देशांवर आम्हीही टॅरिफ लावणार आहोत. प्रशासनांतर्गत अमेरिकेत वस्तू तयार करत नसाल, तर तुम्हाला टॅरिफ भरावा लागेल आणि काही वस्तू, सेवांमध्ये याची किंमती मोठी असेल असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं.
ट्रम्प यांचा भारतावरही आरोप
पहिल्यांदा, ट्रम्प यांनी अमेरिकेवर टॅरिफ लावणाऱ्या देशांची यादीच वाचून दाखवली, "युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत, मेक्सिको आणि कॅनडा आमच्यावर टॅरिफ लावतात. तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकले आहे का? आणि असंख्य इतर देश आमच्याकडून खूप जास्त टॅरिफ वसूल करतात, जे आम्ही त्यांच्याकडून वसूल करतो. हे खूप अन्यायकारक आहे."
advertisement
यानंतर, दुसऱ्यांदा भारताचे नाव घेताना ट्रम्प म्हणाले, "भारत आमच्यावर 100 टक्क्यांपेक्षा जास्त ऑटो टॅरिफ लावतो." त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले, "आमच्या उत्पादनांवर चीनचा सरासरी टॅरिफ आम्ही लावलेल्या टॅरिफच्या दुप्पट आहे आणि दक्षिण कोरियाचा सरासरी टॅरिफ चारपट जास्त आहे. चारपट जास्त टॅरिफ... याचा विचार करा. आणि आम्ही दक्षिण कोरियाला लष्करी आणि इतर अनेक मार्गांनी खूप मदत करतो."
advertisement
2 एप्रिलपासून 'रेसिप्रोकल टॅरिफ' लागू
ट्रम्प यांनी सांगितले की, "आमचे मित्र आणि शत्रू दोघेही असे करत आहेत. ही व्यवस्था अमेरिकेसाठी योग्य नाही आणि कधीच योग्य नव्हती." टॅरिफ वॉरची सुरुवात करताना त्यांनी घोषणा केली की, "म्हणून 2 एप्रिल रोजी रेसिप्रोकल टॅरिफ सुरू होईल. म्हणजेच, अमेरिकाही इतर देशांवर टॅरिफ लावायला सुरुवात करेल."
ट्रम्प यांनी आपल्या भाषणाला विनोदी वळण देताना म्हटले, "मला हे 1 एप्रिलपासून सुरू करायचे होते, पण एप्रिल फूल केल्यासारखं वाटलं असतं, ते नको होतं, एप्रिल फूल नाही तर खरंच . जरी या दिवसाच्या विलंबाने आम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतील, तरीही आम्ही ते एप्रिलमध्ये करणार आहोत. मी खूप अंधश्रद्धाळू व्यक्ती आहे." ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, "कोणताही देश अमेरिकन आयातीवर जितका टॅरिफ लावेल, आम्ही त्यावर तितकाच टॅरिफ लावू."
advertisement
टॅरिफ वॉरमुळे जागतिक बाजारपेठेत भूकंप?
युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत, मेक्सिको आणि कॅनडा हे देश अमेरिकेच्या उत्पादनांवर मोठा टॅरिफ लावतात, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतासारख्या विकसनशील देशांना याचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.
भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर डबल धक्का
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, भारत अमेरिकेच्या ऑटोमोबाईल उत्पादनांवर 100% टॅरिफ लावतो. त्यामुळे अमेरिकन गाड्या भारतीय बाजारपेठेत खूप महाग झाल्या आहेत. जर अमेरिका देखील भारतीय ऑटो उत्पादनांवर असेच टॅरिफ लावले, तर टाटा, महिंद्रा आणि मारुतीसारख्या कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो.
advertisement
टॅरिफ म्हणजे नक्की काय?
टॅरिफ म्हणजे आयात किंवा निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर लावला जाणारा कर. यामुळे आयात केलेले उत्पादन महाग होते आणि स्थानिक उत्पादकांना संरक्षण मिळते. उदाहरणार्थ, जर भारताने अमेरिकेच्या सफरचंदावर 100% टॅरिफ लावला तर 100 रुपयांचे सफरचंद थेट 200 रुपयांना मिळतात, ज्यामुळे लोक स्थानिक सफरचंद खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
भारतीय गुंतवणूकदारांवर काय परिणाम?
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय आयात करणाऱ्या कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, शेअर बाजारातही अस्थिरता वाढू शकते. ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी आणि कृषी उत्पादन कंपन्यांना याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 05, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
अमेरिकेचे भारतावर गंभीर आरोप, भारत-अमेरिका मैत्री संबंधात मिठाचा खडा पडणार?