शेअर मार्केट डाउन असेल तरी नो टेन्शन 7 पद्धतीनं तुम्ही करू शकता भरपूर कमाई

Last Updated:

शेअर मार्केट कोसळल्यास काय करावं? 'या' टिप्स फॉलो करून घसरणीच्या काळातही मिळतील पैसे

News18
News18
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार दिसत आहेत. ऑक्टोबर महिना तर शेअर मार्केटसाठी अजिबात चांगला नव्हता. विशेषत: किरकोळ गुंतवणूकदारांना गेल्या महिनाभरात मोठा फटका बसला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी आतापर्यंतच्या उच्चांकावरून सुमारे आठ टक्क्यांनी खाली घसरले आहेत. निफ्टीचा सार्वकालिक उच्चांक 26277 अंकांवर होता तर निफ्टी घसरून 24200 च्या आसपास ट्रेड करत होता. या घसरणीमुळे स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सना सर्वाधिक फटका बसला आहे. मार्केट सेंटिमेंट्स खराब झाल्यामुळे चांगले शेअर्स देखील आता स्वस्त दरांत उपलब्ध आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याची संधी निर्माण झाली आहे.
शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसे कमवता येतात, असं म्हटलं जातं. काही लोकांना पाच हजार रुपयांपासून गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. ते आता कोट्यवधी रुपये कमवत आहेत. अनेकदा पैसे कमवण्याच्या शर्यतीत लोक नियम आणि धोके विसरतात किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. परिणामी, कधीकधी खूप मोठा आर्थिक फटका बसतो. 90 टक्क्यांहून अधिक किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमधून पैसे कमवता येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक किरकोळ गुंतवणुकदाराने शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी थोडा अभ्यास केला पाहिजे. गुंतवणुकीचे नियम पाळणारे 10 टक्के किरकोळ गुंतवणूकदार पैसे कमवण्यात यशस्वी होतात. काही टिप्स फॉलो करून तुम्ही देखील शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकता.
advertisement
1) सुरुवात कशी करावी: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर मार्केट म्हणजे काय? ते कसं चालतं? त्यातून लोक कसे पैसे कमवतात? हे जाणून घेतलं पाहिजे. सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही घरबसल्या याबाबत ऑनलाइन माहिती जमा करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही आर्थिक सल्लागाराची देखील मदत घेऊ शकता. तो तुम्हाला गुंतवणुकीचा योग्य मार्ग सांगेल.
advertisement
2) कमी रकमेतून गुंतवणूक सुरू करा: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे मोठी रक्कम असलीच पाहिजे, असं बंधनकारक नाही. बहुतांश लोक आपली संपूर्ण बचत शेअर मार्केटमध्ये गुंतवतात. त्यांना मार्केटमधील चढ-उतार सहन करता येत नाहीत. त्यामुळे अगदी छोट्या रकमेपासून म्हणजे फक्त पाच हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
3) टॉप कंपन्यांची निवड करावी: सुरुवातीला रिटर्नवर जास्त लक्ष केंद्रीत करू नये. कारण, जास्त परतावा मिळवण्यासाठी अनेक लोक मजबूत नसलेल्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतात आणि नंतर अडकतात. त्यामुळे लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरू करा. काही वर्षांचा अनुभव आल्यानंतर तुम्ही धोका पत्करू शकता.
advertisement
4) सातत्य ठेवण्याची गरज: कमी रकमेतून गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यानंतर दर महिन्याला त्यात थोडी-थोडी वाढ करावी. आपला पोर्टफोलिओ संतुलित ठेवला पाहिजे. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये काही वर्षे सतत गुंतवणूक करत राहाल तेव्हा तुमची ध्येयं आपोआप साध्य होतील. अनेकदा मार्केटमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होतो.
5) पेनी स्टॉक्सपासून दूर राहावं: किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा स्वस्त शेअर्सवर लक्ष केंद्रीत करतात. ते आपल्या पोर्टफोलिओमध्ये 10 ते 15 रुपये किमतीचे शेअर्स घेतात. या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर मग त्यांना भीती वाटते. अनेक गुंतवणूकदारांना असं वाटतं की, स्वस्त शेअर्समध्ये कमी गुंतवणूक करून ते अधिक कमवू शकतात. पण, हा विचार चुकीचा आहे. नेहमी कंपनीची वाढ लक्षात घेऊन शेअर्स निवड केली पाहिजे. ज्या कंपनीचा व्यवसाय आणि व्यवस्थापन चांगलं आहे, अशा कंपनीतच गुंतवणूक करावी.
advertisement
6) घसरण झाल्यास घाबरू नये: जेव्हा शेअर मार्केटमध्ये घसरण होते तेव्हा चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवावी. जोपर्यंत कमाई होते तोपर्यंत किरकोळ गुंतवणूकदार गुंतवणूक ठेवतात. घसरण सुरू होताच ते घाबरून आपल्याकडील शेअर्स स्वस्तात विकतात. हे नुकसान होण्याचं सर्वात मोठ कारण आहे. याउलट मोठे गुंतवणूकदार खरेदीसाठी घट होण्याची प्रतीक्षा करतात.
7) उत्पन्नाचा काही भाग सुरक्षित ठिकाणी गुंतवा: शेअर मार्केटमधून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग सुरक्षित गुंतवणूक म्हणून इतर ठिकाणी गुंतवा. आपल्याला मिळणार नफा अधूनमधून कॅश करत राहावा. प्रत्येक किरकोळ गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती नसताना कशातही गुंतवणूक करू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. देशातील मोठ्या गुंतवणूकदारांना फॉलो केलं पाहिजे.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
शेअर मार्केट डाउन असेल तरी नो टेन्शन 7 पद्धतीनं तुम्ही करू शकता भरपूर कमाई
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement