Stock Market on Budget: बजेट सादर करण्याआधी शेअर बाजारातून आली मोठी अपडेट; सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये तेजी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Union Budget 2025: अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली आहे. थोड्याच वेळात लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जाईल त्याआधी निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली आहे.
मुंबई: बजेटच्या निमित्ताने आज शेअर बाजार सुरू आहे आणि अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही तास आधी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने सकारात्मक संदेश दिला आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स १०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून ७७,६३७ वर सुरू झाला तर निफ्टी५० मध्ये तेजीत म्हणजेच २३,५२८ अंकांवर उघडला. सकाळी ९:२५ वाजता निफ्टी ५० निर्देशांक २४४ अंकांच्या वाढीसह २३४९२ अंकांवर व्यवहार करत होता. त्याच वेळी सेन्सेक्स देखील ७३४ अंकांनी वाढल्यानंतर ७७४८४ अंकांवर व्यवहार करत होता.
आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे संपूर्ण लक्ष २०२५ च्या अर्थसंकल्पाच्या घोषणांवर असेल. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटले गेले होते की गुंतवणूकमधील मंदी तात्पुरती असण्याची शक्यता आहे आणि लवकरच त्यात सुधारणा होऊ शकते. या सर्वेक्षणात महागाई कमी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी म्हणाले?
अर्थसंकल्पाच्या दिवशी प्रामुख्याने पायाभूत सुविधा आणि बांधकाम, बँकिंग आणि वित्तीय सेवा, भांडवली वस्तू आणि उत्पादन, ऑटो आणि इलेक्ट्रिक वाहने (EV), अक्षय ऊर्जा आणि वीज, ग्राहकोपयोगी वस्तू, रिअल इस्टेट आणि सिमेंट, संरक्षण आणि अवकाश, कृषी आणि ग्रामीण फोकस कंपन्याच्या शेअर्सवर सर्वांची नजर असेल.
advertisement
गेल्यावेळी काय झाले होते?
१ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. तेव्हा लोकसभा निवडणुकीचे वर्ष असल्याने अर्थसंकल्पात अशी कोणतीही मोठी घोषणा करण्यात आली नव्हती. त्याचे परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली होती. सेन्सेक्स १०७ अंकांनी घसरून ७१,६५४ वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी-५० निर्देशांक १७ अंकांनी घसरून २१,७०९ वर बंद झाला.
advertisement
गेल्या १० वर्षांत सादर केलेल्या १४ अर्थसंकल्पांपैकी ८ वेळा शेअर बाजार घसरला आहे आणि ६ वेळा वाढला आहे. आता २०२५ च्या अर्थसंकल्पावर शेअर बाजार कशी प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष असेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2025 10:47 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Stock Market on Budget: बजेट सादर करण्याआधी शेअर बाजारातून आली मोठी अपडेट; सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये तेजी


