क्लाउडफेअरमुळे ट्रेडिंग API क्रॅश! Share बाजारात ऑर्डर्स अडकल्या; Zerodha–Angel One–Groww बंद पडले

Last Updated:

Share Market: क्लाउडफेअरच्या अचानक आलेल्या आउटेजने काही मिनिटांतच जागतिक इंटरनेट सेवांमध्ये प्रचंड गडबड निर्माण केली. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सपासून AI आणि ट्रॅव्हल अ‍ॅप्सपर्यंत अनेक सेवा ठप्प पडल्याने वापरकर्त्यांमध्ये संताप उसळला.

News18
News18
मुंबई: क्लाउडफेअरमध्ये आलेल्या तात्पुरत्या बिघाडामुळे काही काळ संपूर्ण इंटरनेट जगतात खळबळ उडाली. या आउटेजचा थेट परिणाम ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स Zerodha, Angel One, Groww यांच्यासह अनेक ऑनलाईन सेवांवर झाला.
युझर्सना लॉग-इन करण्यात, ऑर्डर प्लेस करण्यात आणि मार्केट डेटा पाहण्यात अडचणी येऊ लागल्या. कारण या प्लॅटफॉर्म्सचे API आणि बॅकएंड सिस्टम्स क्लाउडफेअरवर अवलंबून असल्याने त्यांचे सर्व्हर कनेक्ट होण्यात अडथळे निर्माण झाले. ही अडचण अनेक प्रदेशांमध्ये जाणवली आणि वेबसाइट्स, फिनटेक सेवा तसेच एंटरप्राइझ टूल्स यांसारख्या क्लाउडफेअरच्या नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरवर चालणाऱ्या इतर सेवांवरही याचा परिणाम झाला.
advertisement
बाजार खुले असताना ट्रेडिंग काही काळ ठप्प झाल्याने युझर्संनी सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पाडला. दरम्यान क्लाउडफेअरने तत्काळ दुरुस्तीची कामे सुरू केल्यामुळे सेवा हळूहळू स्थिर होऊ लागल्या. मात्र संभाव्य उशीर किंवा उरलेल्या तांत्रिक त्रुटींसाठी प्लॅटफॉर्म्स सतत मॉनिटरिंग करत राहिले.
advertisement
या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सव्यतिरिक्त Claude AI Chatbot, Perplexity, MakeMyTrip यांसारख्या क्लाउडफेअरवर चालणाऱ्या इतर सेवांच्याही कामकाजावर या आउटेजचा परिणाम झाला.
हे क्लाउडफेअरचं पहिलंच मोठं आउटेज नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये हा दुसरा मोठा बिघाड आहे. मागील महिन्यातही क्लाउडफेअरमधील तांत्रिक दोषांमुळे जवळपास संपूर्ण इंटरनेटच ठप्प पडले होते. X , ChatGPT, Letterboxd, अगदी Downdetectorसारख्या सेवाही त्या वेळी बंद पडल्या होत्या, कारण त्या देखील क्लाउडफेअरवरच चालतात. कंटेंट डिलिव्हरी, सुरक्षा आणि ट्रॅफिक मॅनेजमेंटसारख्या सेवा पुरवणाऱ्या क्लाउडफेअरमध्ये छोटासा त्रुटीबिंदूही निर्माण झाला तरी त्याचा परिणाम काही मिनिटांत जगभरातील अनेक सेवांवर होतो.
advertisement
क्लाउडफेअरने आपल्या अधिकृत स्टेटस पेजद्वारे दुजोरा दिला आहे की आता सर्व सेवा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. डॅशबोर्ड आणि संबंधित API वर परिणाम करणारा हा बिघाड सुमारे 12 मिनिटे चालला. 08:56 UTC (2:26pm IST) वाजता समस्या रिपोर्ट झाली आणि 09:12 UTC (2:42pm IST) वाजता दुरुस्तीचे पॅच लागू करण्यात आले. सध्या सर्व सिस्टम्स मॉनिटरिंगखाली आहेत. या कालावधीत काही वापरकर्त्यांना रिक्वेस्ट फेल्युअर्सचा सामना करावा लागला.
advertisement
क्लाउडफेअर म्हणजे काय?
क्लाउडफेअर हे आधुनिक इंटरनेटचे एक प्रमुख आधारस्तंभ मानले जाते. हे प्लॅटफॉर्म कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क (CDN), सुरक्षा संरक्षण, ट्रॅफिक नियंत्रण आणि सायबर हल्ल्यांच्या वेळी वेबसाइट्स कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध सेवांची जबाबदारी संभाळते. त्यामुळे त्याच्या नेटवर्कमध्ये किंचितही बिघाड झाला की अनेक वेबसाइट्स आणि ऑनलाइन सेवांवर त्याचा जबरदस्त परिणाम तात्काळ दिसून येतो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
क्लाउडफेअरमुळे ट्रेडिंग API क्रॅश! Share बाजारात ऑर्डर्स अडकल्या; Zerodha–Angel One–Groww बंद पडले
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement