Police Raid : चहा नव्हे नोटांचा वर्षाव, पोलीसांनी छापा टाकताच 80 लाखांची रक्कम आणि... बातमी समोर येताच परिसरात खळबळ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंतर हे चहाचं दुकान म्हणजे एक गुन्हेगारी अड्डा होता. हे प्रकरण तेलंगणामध्ये समोर आलं आहे.
मुंबई : भारतीय लोकांचं चहा हे आवडीचं पेय आहे, अनेकांची सकाळ चहानेच होते. तर काही काम करणारा वर्ग तर तलप येताच चहा पितो. मग ते वेळ काळ काहीच पाहात नाहीत. कारण चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हा लागतोच. पण एका चहाच्या दुकाना संबंधीत अशी एक बातमी समोर आली आहे की ते पाहून तुम्हाला धक्का बसेल आणि तुम्ही विचार करत बसाल की आता चहा प्यायला जायचं की नाही.....
खरंतर हे चहाचं दुकान म्हणजे एक गुन्हेगारी अड्डा होता. जिथे पैसे आणि शस्त्र लपवण्यात आले होते. हे प्रकरण तेलंगणामध्ये समोर आलं आहे.
तेलंगणातील जगैयापेट येथे पोलिसांनी छापा टाकून तब्बल 80 लाख रुपये रोख रक्कम आणि काही शस्त्रं जप्त केली आहेत. ही कारवाई ‘राजस्थान टी स्टॉल’ नावाच्या एका चहाच्या दुकानात करण्यात आली. यावेळी पोलिसांनी तीन आरोपींना अटकही केली.
advertisement
ही कारवाई मिर्यालगुडा (नलगोंडा) येथे झालेल्या चोरीच्या प्रकरणाशी जोडली जात आहे. तिथल्या एका हॉटेलमधून 80 लाख रुपये चोरीला गेले होते. पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यावरून आरोपींचा माग काढला. तपासात समोर आलं की आरोपी जगैयापेटमध्ये चहाचं दुकान चालवत होते.
यानंतर पोलिसांनी छापा टाकून दुकान आणि परिसराची तपासणी केली. त्यावेळी तिथे लपवलेले पैसे आणि शस्त्रं सापडले. पोलिसांनी सांगितलं की ही संपूर्ण कारवाई अतिशय काळजीपूर्वक पार पाडण्यात आली.
advertisement
सध्या अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत आणखी कोणते लोक चोरीत सामील होते का, हे शोधलं जात आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. चौकशीत हेही समोर आलं की आरोपींनी चोरीची रक्कम लपवण्यासाठी आणि शस्त्रं ठेवण्यासाठी चहाच्या दुकानाचा वापर केला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 6:10 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Police Raid : चहा नव्हे नोटांचा वर्षाव, पोलीसांनी छापा टाकताच 80 लाखांची रक्कम आणि... बातमी समोर येताच परिसरात खळबळ