Sanjay Duttचा नवा बिझनेस; 45 दिवसात कमावले 15 कोटी, काय आहे द ग्लेनवॉक!

Last Updated:

Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्तने डिसेंबर महिन्यात द ग्लेनवॉक नावाचा स्कॉच व्हिस्की ब्रँड बाजारात आणला होता. अवघ्या काही दिवसात या ब्रँडची बाजारात तुफान विक्री झाली आहे.

News18
News18
मुंबई: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा त्याच्या भूमिका आणि चित्रपटांमुळे चर्चेत असतो. मात्र आता संजय दत्तची चर्चा होत आहे ती थोड्या वेगळ्या कारणामुळे होय. संजय दत्त फक्त चित्रपटातील भूमिका करत नाही तर तो एक बिझनेसमन देखील आहे. त्याने नुकत्यात एक स्कॉच व्हिस्की ब्रँड बाजारात आणला होता आणि आता या बिझनेसमधून त्याने मोठी कमाई केली आहे.
संजय दत्तने काही दिवासांपूर्वी द ग्लेनवॉक नावाचा स्कॉच व्हिस्की ब्रँड बाजारात आणला होता. त्याचा ब्रँड बाजारात सुपर हिट ठरला आहे. डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च झालेल्या 200ml च्या या बॉटलने फक्त 45 दिवसात 3 लाखांहून अधिक विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. संजयच्या या कंपनीने फक्त 3 महिन्यातील काळात 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. द ग्लेनवॉकच्या एका बाटलीची किंमत 500 रुपये इतकी आहे.
advertisement
ईडीने माझे 500 ते 700 कोटी जप्त केले; 1 हजार कोटींची संपत्ती सोडून...
द ग्लेनवॉकची सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात होत आहे. एकूण विक्रीपैकी महाराष्ट्रातील विक्रीचा 68% वाटा आहे. राज्यभरात 200ml च्या निप फॉरमॅटला मोठी मागणी असून, ही व्हिस्की 1,400 पेक्षा अधिक वाईन शॉप्स आणि 3,500 हून अधिक बारमध्ये उपलब्ध आहे. कंपनीचे उद्दिष्ट पुढील दोन महिन्यांत 3,000 नव्या परमिट रूम्समध्ये ब्रँडचा विस्तार करण्याचे आहे, त्यामुळे लवकरच ही व्हिस्की अधिक सहज उपलब्ध होणार आहे.
advertisement
द ग्लेनवॉकचे ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या संजय दत्त यांनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले, द ग्लेनवॉक हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण साजरे करण्यासाठी आहे. नवीन 200ml निप बॉटलने कुठेही, कधीही उत्तम स्कॉचचा आनंद घेता येतो.
2008 पेक्षा वाईट ठरू शकते 2025! गुंतवलेले पैसे आताच काढून घ्या, नाही तर...
ही स्कॉच व्हिस्की स्कॉटलंडमध्ये तयार केली जाते आणि तेथेच तिचे पॅकिंग होते. कार्टेल ब्रदर्स ही कंपनी भारतात या व्हिस्कीची विक्री करते. कंपनीचे संस्थापक सदस्य मोक्ष सानी यांनी सांगितले की, त्यांचा उद्देश जागतिक दर्जाची, सहज उपलब्ध आणि प्रीमियम व्हिस्की ग्राहकांना देणे हा आहे.
advertisement
द ग्लेनवॉक व्हिस्कीने अवघ्या दोन वर्षांत बाजारात स्वतःची मजबूत पकड मिळवली आहे. ही व्हिस्की भारतासह दुबईमध्येही उपलब्ध आहे. तसेच, कंपनी लवकरच ही व्हिस्की इतर देशांमध्येही लाँच करण्याच्या तयारीत आहे.
मराठी बातम्या/मनी/
Sanjay Duttचा नवा बिझनेस; 45 दिवसात कमावले 15 कोटी, काय आहे द ग्लेनवॉक!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement