Trump World Centre: डोनाल्ड ट्रम्प पुण्यात उभारणार भारतातील पहिले कमर्शियल ऑफिस; ट्रम्प वर्ल्ड सेंटरचे लोकेशन ठरले

Last Updated:

Trump World Centre In Pune: पुण्यात उभारले जाणारे ‘ट्रम्प वर्ल्ड सेंटर’ हे भारतातील पहिले व्यावसायिक प्रकल्प म्हणून ओळखले जाणार आहे. हा 289 मिलियन डॉलर्सचा भव्य प्रकल्प दोन अत्याधुनिक टॉवर्ससह 16 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर विस्तारलेला असेल.

News18
News18
पुणे: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नाव सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे व्यापार युद्धाची शक्यता आणि त्याचा जगातील शेअर बाजारावर होणारा परिणाम यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. युक्रेन युद्ध असो की इस्रायल पॅलेस्टाइन प्रश्नाबाबत ट्रम्प यांच्या भूमिकेवरून जगभरात अस्वस्थता आहे. या सर्व गोंधळात ट्रम्प यांच्या नावाची चर्चा भारतात आणि ती देखील महाराष्ट्रात सुरू आहे जाणून घ्या त्याचे कारण...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने भारतात पहिल्यांदाच एक कमर्शियल ऑफिस उभारले जात आहे. हे ऑफिस पुण्यातील कोरेगाव पार्कजवळ उभारले जाणार आहे. ट्रम्प ब्रँडच्या नावाने देशात अनेक रेसिडेंशियल प्रॉपर्टीज आधीपासून उपलब्ध आहेत. परंतु कमर्शियल प्रॉपर्टी मात्र नव्हती. आता ' ट्रम्प वर्ल्ड सेंटर'च्या माध्यमातून अशी प्रॉपर्टी तयार होणार आहे.
advertisement
प्रकल्पाची घोषणा आणि भागीदारी
ट्रम्प ऑर्गनायझेशनचे भारतातील भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्सचे (Tribeca Developers) कल्पेश मेहता यांनी बुधवारी या प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम कंपनी कुंदन स्पेसेस (Kundan Spaces) यांच्यासोबत विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत दोन उच्चस्तरीय व्यावसायिक टॉवर्स उभारले जातील. कंपनीला या प्रकल्पामधून सुमारे 289 मिलियन डॉलर्स (सुमारे 2400 कोटी रुपये) इतक्या महसुलाची अपेक्षा आहे.
advertisement
टॉवर्सचा विस्तार आणि वैशिष्ट्ये
'ट्रम्प वर्ल्ड सेंटर पुणे' हे एकूण 16 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर विस्तारलेले असेल. यामध्ये दोन आधुनिक काचेचे टॉवर्स असतील, ज्यामध्ये 27 किंवा त्याहून अधिक मजल्यांवर ऑफिस स्पेस उपलब्ध असतील.
-एका टॉवरमध्ये कार्यालये खरेदीसाठी उपलब्ध असतील.
-दुसऱ्या टॉवरमध्ये मोठ्या कार्यालयांना भाड्याने देण्याची सुविधा असेल.
-यामुळे विविध उद्योगांच्या गरजा पूर्ण करता येतील.
advertisement
ट्रम्प ब्रँडसाठी मोठी बाजारपेठ
कल्पेश मेहता यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेबाहेर ट्रम्प ब्रँडसाठी भारत हा सर्वात मोठा बाजार आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशनचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट एरिक ट्रंप यांनीही एका निवेदनात सांगितले की, भारतात ट्रम्प ब्रँडला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. आता आम्ही आमचे पहिले व्यावसायिक प्रकल्प सुरू करताना खूप उत्सुक आहोत.
मुंबईत 'ट्रम्प टॉवर'
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2014 मध्ये भारताला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी मुंबईत लोढा ग्रुपसोबत भागीदारी करून वरळी येथे 75 मजली 'ट्रम्प टॉवर' सुरू केले होते. हा प्रकल्प एक आलिशान निवासी गृहनिर्माण प्रकल्प होता आणि तो अत्यंत यशस्वी ठरला. आता ट्रम्प ऑर्गनायझेशन व्यावसायिक मालमत्तेच्या क्षेत्रात भारतात आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
advertisement
ट्रम्प वर्ल्ड सेंटर 
हा प्रकल्प पुणे शहराच्या वाढत्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. आधुनिक डिझाइन, उच्चस्तरीय सुविधा आणि जागतिक दर्जाचे ऑफिस स्पेस उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प पुण्याला एक नवीन ओळख मिळवून देईल. तसेच, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी हे एक प्रमुख आकर्षण ठरू शकते.
ट्रम्प वर्ल्ड सेंटर हा पुणे आणि भारतासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे. यामुळे पुण्यातील व्यावसायिक क्षेत्राला नवीन उंची गाठण्याची संधी मिळणार आहे. भारतीय बाजारपेठेत ट्रम्प ब्रँडची वाढती लोकप्रियता पाहता, हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर यशस्वी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/मनी/
Trump World Centre: डोनाल्ड ट्रम्प पुण्यात उभारणार भारतातील पहिले कमर्शियल ऑफिस; ट्रम्प वर्ल्ड सेंटरचे लोकेशन ठरले
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement