Budget 2024: क्रिप्टो मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांना दणका, टॅक्समध्ये बदल झाले का?

Last Updated:

बजेटची घोषणेनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये दीड टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. क्रिप्टो मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी काय बदल झाले?

क्रिप्टो मार्केट टॅक्समध्ये काय बदल झाले?
क्रिप्टो मार्केट टॅक्समध्ये काय बदल झाले?
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. देशाच्या विकासासाठी काय कसं बजेट असणार? काय प्लॅन आहे निर्मला सीतारामण यांनी सादर केला. बजेटची घोषणेनंतर शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये दीड टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. क्रिप्टो मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी काय बदल झाले?
क्रिप्टो मार्केट टॅक्समध्ये काय बदल झाले?
क्रिप्टोमध्ये ट्रेंडिंग करणाऱ्यांना 30 टक्के टॅक्स द्यावा लागत होता. आणि 1 टक्के टीडीएस द्यावा लागत होता. तो तसाच कायम आहे. यामध्ये कोणतेही बदल नाही. शेअर मार्केटमध्ये ट्रे़डिंग करत असताना 10 ते 12.50 टक्के कर द्यावा लागत होता. त्यामुळे क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणारे टॅक्स कमी करावा अशी आशा बाळगून होते. पण कोणतेही बदल झाले नाही.
advertisement
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते शेअर मार्केटमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, SBI च्या शेअर्समध्ये सुमारे दोन टक्के आणि L&T च्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Budget 2024: क्रिप्टो मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांना दणका, टॅक्समध्ये बदल झाले का?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement