Budget 2025: कधी सादर होणार बजेट, किती वाजता आणि कुठे पाहायचं LIVE?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Union Budget 2025: न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलवर, ट्विटरवर आणि न्यूज 18 मराठीच्या वेबसाईटवर तुम्हाला बजेटचे सगळे अपडेट्स पाहता येणार आहे
मुंबई: केंद्र सरकारचं 2025-26 रोजीचं बजेट सत्र 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. दुसरं सत्र 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. नुकतंच हलवा सेरेमनी झाल्यानंतर आता सगळ्यांना बजेट कधी सादर केलं जाणार याची उत्सुकता आहे. यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांना टॅक्समधून दिलासा मिळणार का? या बजेटमधून रिकव्हरी होऊन शेअर मार्केटला स्थिरता येणार का याची उत्सुकता आहे.
कधी सादर होणार बजेट?
1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर केलं जाणार आहे. या बजेटचं लाईव्ह प्रसारण केलं जाणार आहे. आधी लोकसभेत नंतर राज्यसभेत हे बजेट सादर केलं जाणार आहे. या बजेटचं लाईव्ह प्रसारण युट्यूब आणि ट्विटरवर केलं जाणार आहे. याशिवाय न्यूज 18 मराठीवर देखील तुम्ही संपूर्ण बजेट लाईव्ह पाहू शकता.
advertisement
कुठे आणि कसं पाहायचं लाईव्ह?
याशिवाय तुम्ही लोकसभेच्या ट्विटर हॅण्डलवर जाऊन लाईव्ह बजेट पाहू शकता. बजेट 2025 साठी खास अॅप तयार करण्यात आलं आहे. तुम्ही ते डाउनलोड करुन देखील बजेट लाईव्ह पाहू शकता. तिथून तुम्ही बजेटचे डॉक्युमेंट ऑनलाईन डाऊनलोड करू शकता. www.indiabudget.gov.in या वेबसाईटवर देखील तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं संपूर्ण भाषण आणि डॉक्युमेंट इथे तुम्हाला मिळू शकतात. हे मोबाईल अॅप हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत काम करतं. त्यामुळे लोकांना बजेट अगदी सोप्या भाषेत समजणं सोपं जावं यासाठी सरकारने ही तरतूद केली आहे.
advertisement
न्यूज 18 मराठीवर पाहू शकता LIVE
न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलवर, ट्विटरवर आणि न्यूज 18 मराठीच्या वेबसाईटवर तुम्हाला बजेटचे सगळे अपडेट्स पाहता येणार आहे. शेतकरी, महिला, टॅक्स पेअर्स, उद्योजक, पेन्शनर्स यांच्यासाठी काय घोषणा होणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे बजेटची सर्वजण वाट पाहात आहे. टॅक्स स्लॅबचे नियम बदलणार का याची देखील उत्सुकता आहे. नव्या टॅक्स पेअर्सना दिलासा मिळणार का हे देखील पाहावं लागणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 27, 2025 2:25 PM IST


