Personal Loan फेडलं नाही तर काय होईल? अशा परिस्थीतीत बँक काय करते?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Personal Loan Default Action : अनेकदा लोकांना हा लोन फेडता येत नाही. यासंबंधीत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थीत रहातो की जर हे पर्सनल लोन फेडता आलं नाही तर? जर हे फेडलं नाही तर काय कारवाई होऊ शकते?
मुंबई : लोक काही ना काही कामासाठी पर्सनल लोक घेतात. हे पर्सनल लोक काही हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत असतं. अचानक आर्थिक गरज पडली की लोक पर्सनल लोक घेतात. हा लोक कमी डोक्युमेंटमध्ये आणि लवकरात लवकर मिळते. म्हणूनच याला आपातकालीन लोन देखील म्हणतात.
पर्सनल लोन हे काही दिवसांसाठी वर्षांसाठी घेता येतं. पण या लोनचा इटरेस्ट रेट खूप जास्त असतो. त्यामुळे अनेकदा लोकांना हा लोन फेडता येत नाही. यासंबंधीत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थीत रहातो की जर हे पर्सनल लोन फेडता आलं नाही तर? जर हे फेडलं नाही तर काय कारवाई होऊ शकते?
1. बँक लीगल एक्शन घेऊ शकते
जर ग्राहकाने वारंवार सूचना मिळूनही कर्ज फेडले नाही, तर बँक कायदेशीर कारवाई (Legal Action) करू शकते. यामध्ये बँक सिव्हिल केस दाखल करून कोर्टाकडून कर्ज वसुलीचा आदेश मिळवू शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये कोर्ट संबंधित व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्याचा आणि विक्रीसाठी लावण्याचा आदेशही देऊ शकते.
advertisement
2. लोन रिकवरी एजंट पाठवले जाऊ शकतात
AU स्मॉल फायनान्स बँक च्या माहितीनुसार, बँक डेट कलेक्शन एजन्सीला कर्ज वसुलीचे काम सोपवू शकते. हे एजंट थेट व्यक्तीशी संपर्क साधून त्याच्याकडून कर्ज फेडण्याची मागणी करतात. काही वेळा या रिकव्हरी एजंटकडून मनस्ताप किंवा मानसिक त्रास होण्याची शक्यता असते.
3. सिबिल स्कोअरवर परिणाम
जर आपण पर्सनल लोन वेळेवर फेडले नाही, तर सिबिल स्कोअर (CIBIL Score) खराब होतो. यामुळे भविष्यात कोणतेही कर्ज घेणे कठीण होऊ शकते. कर्ज मिळाले तरी त्यावर जास्त व्याजदर आकारला जाऊ शकतो.
advertisement
काय करावे?
पर्सनल लोन घेण्यापूर्वी त्याचा परतफेडीचा सक्षम आर्थिक प्लॅन बनवा.
वेळेवर हफ्ते (EMI) भरणे अत्यंत आवश्यक आहे.
लोन परतफेडीमध्ये अडचण येत असल्यास, बँकेशी संपर्क साधून लोन री-स्ट्रक्चरिंग किंवा मोरॅटोरियम पर्यायाचा विचार करा.
पर्सनल लोन वेळेवर न फेडल्यास मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लोन घेण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 29, 2025 4:46 PM IST