Woman Success: सोन्याने दराचा उच्चांक गाठला, अन् महिलेने संधी साधली, नव्या व्यवसायातून करतेय लाखोची कमाई

Last Updated:

Business Success: मनात जर जिद्द असेल आणि पक्का निर्णय घेतला तर कोणत्याही परिस्थितीत यश मिळवणं सोपं होतं. अहिल्यानगरमधील एका गृहिणीने हेच सत्यात उतरवलं आहे.

+
Woman

Woman Success: सोनं महागलं, गृहिणीनं ठरवलं, या बिझनेसमधून लाखोंची कमाई

अहिल्यानगर: एखाद्या महिलेनं ठरवलं तर ती कोणत्याही क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकते. अहिल्यानगरमधील 54 वर्षांच्या प्रीती चोळके यांचा प्रवास काहीसा असाच आहे. 1992 मध्ये इलेक्ट्रिकल डिप्लोमा केल्यानंतर लग्न झालं आणि कौटुंबिक जबाबदारी आली. त्यामुळे करिअरचा विषय मागे पडला. पण स्वत:चा वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास कायम होता. पुढे त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. परंतु, त्यातही चांगली यश मिळालं नाही. तरीही जिद्द न सोडता त्यांनी ज्वेलरी शॉप सुरू केला. आता जिद्दीनं आणि कष्टानं त्यांनी आपल्या व्यवसायात चांगलं यश मिळवलंय.
प्रीती चोळके यांनी सुरुवातीला 2010 मध्ये लेडीज वेअर व बेबी केअर हे दुकान चालू केले. तेव्हापासून ते दुकान चालू होतं. परंतु कोरोनानंतर बरेच बदल झाले आणि काळानुसार बदललं पाहिजे, अशी जाणीव निर्माण झाली. त्यानुसार आजच्या घडीला आपण काय वेगळं व्यवसाय करू शकतो? असा विचार करत असताना एक कल्पना सूचली. सोनं महाग झालं असून महिला आणि मुलींमध्ये ज्वेलरीची क्रेझ कायम आहे. त्यासाठी ज्वेलरी शॉपचा व्यवसायात सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
advertisement
प्रीती यांनी 17 फेब्रुवारी 2025 ला सखी फॅशन ज्वेलरी या शॉप चा उद्घाटन केलं. त्यांनी नमो ब्रँड ज्वेलरी फ्रेंचाईजी घेतली आहे. त्यांच्या ज्वेलरी शॉप मध्ये सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी, अमेरिकन डायमंड ज्वेलरी, फॅशन ज्वेलरी, ब्रायडर ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी, बँगल्स, मायक्रो गोल्ड प्लेट्स ज्वेलरी, अँटिक्वे अमेरिकन डायमंड, एअरिंग ट्रॅडिशनल बँगल्स, गोल्ड प्लेटेड नेकलेस उपलब्ध आहे. सर्व ज्वेलरी ही कॉपर बेस्ड ज्वेलरी असून त्यामुळे ती खराब होत नाही, असं प्रीती सांगतात.
advertisement
मनात जर जिद्द असेल आणि पक्का निर्णय घेतला तर नक्कीच कोणत्याही परिस्थितीत यश मिळवणं सोपं होऊन जातं. त्यामुळे स्वप्न नेहमी मोठी असावी. प्रत्येक महिलांनी छोटासा का होईना स्वतःचा व्यवसाय किंवा जॉब करून घराला हातभार लावावा. जर प्रत्येक महिलेने स्वतःला बिझी ठेवलं तर आनंद आणि निरोगी आयुष्य जगण्यात मदत होईल, असा संदेश यावेळी प्रीती चोळके देतात.
मराठी बातम्या/मनी/
Woman Success: सोन्याने दराचा उच्चांक गाठला, अन् महिलेने संधी साधली, नव्या व्यवसायातून करतेय लाखोची कमाई
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement