2025 मध्ये कोणता देश सर्वात जास्त कर्जाबाजारी? IMF कडून धक्कादायक रिपोर्ट, टॉप 10 नावांची यादी समोर

Last Updated:

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालातून जागतिक कर्जाच्या संकटाची भयावहता समोर आली आहे. या अहवालानुसार, पुढील काही वर्षांत ही स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : जागतिक अर्थव्यवस्था सध्या एका निर्णायक टप्प्यातून जात आहे. महागाई, भू-राजकीय संघर्ष आणि विकासाचा मंदावलेला वेग यामुळे अनेक देशांसमोरील आर्थिक आव्हाने वाढली आहेत. पण या सगळ्यात सर्वात मोठी चिंता निर्माण करणारी बाब म्हणजे सरकारवर वाढणारा कर्जाचा बोजा (Public Debt).
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालातून जागतिक कर्जाच्या संकटाची भयावहता समोर आली आहे. या अहवालानुसार, पुढील काही वर्षांत ही स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा धोका असा आहे की, 2030 पर्यंत जगाचे एकूण सार्वजनिक कर्ज (Global Public Debt) हे जागतिक सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) च्या जवळजवळ बरोबरीने पोहोचू शकते.
advertisement
एका राष्ट्राच्या आर्थिक क्षमतेच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण किती आहे, हे तपासण्यासाठी 'GDP च्या तुलनेत कर्ज' हे प्रमाण पाहिले जाते. याच आधारावर IMF ने जगातील सर्वाधिक कर्ज असलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे. ही यादी केवळ गरीब देशांची नाही, तर जगातील काही सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थाही या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत. चला जाणून घेऊया, जगातील ती कोणती दहा राष्ट्रे आहेत, ज्यांच्या अर्थव्यवस्थेवर कर्जाचा सर्वाधिक भार आहे.
advertisement
जगातील सर्वाधिक कर्जाचे ओझे असलेले 'टॉप 10' देश
IMF च्या आकडेवारीनुसार, जीडीपीच्या तुलनेत सर्वाधिक कर्ज असलेल्या पहिल्या 10 देशांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
1. जपान (Japan)
विकसित अर्थव्यवस्था असूनही जपान कर्जाच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. जीडीपीच्या जवळपास अडीच पट (सुमारे 240%) कर्ज जपानवर आहे. वाढती वृद्ध लोकसंख्या, आरोग्य सुविधांवर वाढलेला खर्च आणि अर्थव्यवस्थेची संथ गती ही यामागील प्रमुख कारणे आहेत. जपानचे एकूण कर्ज $1,080.1 अब्ज आहे.
advertisement
2. सुदान (Sudan)
संघर्ष, राजकीय अस्थिरता आणि विस्कटलेली व्यवस्था यामुळे सुदान कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. संघर्षामुळे अर्थव्यवस्थेची झालेली हानी आणि वाढलेला खर्च यामुळे त्यांच्यावर 221.5% कर्जाचा भार आहे.
3. सिंगापूर (Singapore)
आर्थिक दृष्ट्या मजबूत असूनही, सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथील कर्ज प्रामुख्याने दीर्घकालीन प्रकल्पांसाठी आणि बाँडच्या माध्यमातून उभारलेल्या गुंतवणुकीशी संबंधित आहे. त्यांच्यावर जीडीपीच्या 175.6 % कर्ज आहे.
advertisement
4. ग्रीस (Greece)
1020 च्या मंदीनंतर ग्रीस अजूनही आर्थिक सुधारणांच्या प्रयत्नात आहे. खर्च आणि विकासाचा समतोल राखण्यात अपयश आल्याने त्यांच्यावर 147.7% कर्ज कायम आहे.
5. बहरीन (Bahrain)
तेलावर आधारित अर्थव्यवस्थेचा हा देश. तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे महसूल घटला आणि कर्जाचा बोजा वाढला. बहरीनवर 142.5 % कर्ज आहे.
6. इटली (Italy)
युरोपमधील मोठी अर्थव्यवस्था असूनही इटलीची विकासाची गती धीमी आहे. यामुळे रोजगार, उद्योग आणि गुंतवणुकीवर परिणाम होऊन कर्ज 136.8 % पर्यंत पोहोचले आहे.
advertisement
7. मालदीव (Maldives)
पर्यटनावर अवलंबून असलेल्या या सुंदर देशाला पर्यटन संकटाचा फटका बसला. विकास प्रकल्पांसाठी सतत बाह्य कर्ज घेतल्याने मालदीववर 131.8 % कर्ज आहे.
8. अमेरिका (USA)
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेवरही कर्जाचा मोठा डोंगर आहे. सरकारी खर्च आणि राजकीय मतभेद यामुळे कर्ज झपाट्याने वाढले असून ते 125% आहे, जे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी चिंता आहे.
advertisement
9. सेनेगल (Senegal)
आफ्रिकेतील हा देश वेगाने विकास साधू इच्छितो, पण मोठ्या प्रकल्पांसाठी घेतलेले बाह्य कर्ज त्यांच्या अर्थव्यवस्थेवर भारी पडले आहे. सेनेगलवर 122.9 % कर्ज आहे.
10. फ्रान्स (France)
सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य योजनांवर होणारा मोठा खर्च, तसेच विकासाची संथ गती यामुळे फ्रान्सची आर्थिक स्थितीही दबावाखाली आहे. फ्रान्सवर 116% कर्ज आहे.
भारतासाठी हा अहवाल काय सांगतो?
या यादीत भारत टॉप 10 मध्ये नसला तरी, IMF ने भारतालाही सार्वजनिक कर्ज कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. भारताचे कर्ज (केंद्र आणि राज्य मिळून) जीडीपीच्या 80% पेक्षा जास्त आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील या वाढत्या कर्जाच्या संकटाकडे पाहता, भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि महसूल वाढवणे हे भारतासह सर्वच देशांसाठी एक मोठे आव्हान असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
2025 मध्ये कोणता देश सर्वात जास्त कर्जाबाजारी? IMF कडून धक्कादायक रिपोर्ट, टॉप 10 नावांची यादी समोर
Next Article
advertisement
Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement