Pune News: पुणेकरांची पुन्हा वाहतूक कोंडी, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल 66 ठिकाणी तोडणार; कारण...
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Pune Sinhagad Road Flyover: पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प लाईन 4 आणि लाईन 4 अ मुळे आता पुन्हा पुणेकरांचा प्रवास ट्रॅफिकमध्येच होणार का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
मुंबईप्रमाणेच कायम वर्दळीचं असलेलं पुणे शहर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या दोन्हीही शहरात केव्हाही जा तुम्हाला हमखास ट्रॅफिक मिळते. सध्या पुण्यामध्ये राज्य सरकारकडून वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी अनेक उड्डाणपुलांची घोषणा केली जात आहे. पण अलीकडेच एका प्रोजेक्टची घोषणा केली. त्यामुळे आता पुन्हा पुणेकरांचा प्रवास ट्रॅफिकमध्येच होणार का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने कोट्यवधी रूपये खर्चुन सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुल उभारला. आता त्याच रस्त्यावर लवकरच मेट्रोचं कामही सुरू होणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना अलीकडेच 118 कोटी रूपये खर्चून उभारलेल्या ह्या पुलाचं काय होणार? असा सवाल आता पुणेकरांना पडला आहे. या प्रश्नावर महानगर पालिकेनेही माहिती दिली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोचे खांब (Pillars) उभारण्यासाठी उड्डाण पुलाचा काही भाग फोडावा लागणार आहे. एकूण 66 ठिकाणी पुलाला 'छेद' देऊन हे खांब वर नेले जातील.
advertisement
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने नव्याने मंजूरी दिलेल्या मेट्रो मार्गासाठी सिंहगड रोडवरील उड्डाणपूलाचा काही तोडण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तब्बल 66 ठिकाणी या पुलाला तोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुण्यात पुन्हा वाहतूक कोंडी होणार आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी 118 कोटी रूपये खर्चण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्याच समस्येशी पुणेकरांना तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने खडकवासला- हडपसर- खराडी आणि नळस्टॉप- माणिकबाग अशा 32 किलोमीटरच्या दोन्हीही मेट्रो मार्गांना परवानगी दिली आहे.
advertisement
या दोन्हीही मेट्रो मार्गांचं काम करण्यासाठी सिंहगड रोडवरील उड्डाणपूलाचा काही भाग तोडण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. एकूण 66 ठिकाणी हा पूल तोडावा लागणार आहे. एकूण 66 ठिकाणी पुलाला 'छेद' देऊन हे खांब वर नेले जातील. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंची रुंदी साधारण 1 मीटरने कमी होईल. उड्डाणपुलाची एका बाजूची रुंदी एकूण 7.32 मीटर इतकी आहे, जी मेट्रोचे खांब बसवल्यानंतर 6.32 मीटर इतकी होईल. याचा अर्थ वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग थोडा अरूंद होणार आहे. यामुळे नागरिकांना काही दिवसांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
advertisement
मेट्रोसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी नव्याने बांधलेला उड्डाणपूल पाडला जाईल का, याबद्दल नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सिंहगड रोडवरील उड्डाणपूल महामेट्रोशी समन्वय साधून बांधण्यात आला होता. बांधकाम सुरू होण्यापूर्वीच मेट्रोच्या खांबांसाठी नियोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारने अलीकडेच खडकवासला ते खराडी यांना जोडणाऱ्या 31.636 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गासाठी 9, 857.85 कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि खांबांची तयारी आधीच सुरू झाली आहे. दरम्यान, राजाराम पूल आणि वडगाव दरम्यान नियोजित 105 खांबांपैकी 39 खांबांचे पायाभरणीचे काम पूर्ण झाले.
advertisement
उर्वरित खांबांसाठी, बांधकामाला परवानगी देण्यासाठी उड्डाण पुलाच्या संरचनेचे काही भाग तोडण्यात येणार आहे. त्यानंतरच खांब वर घेतले जातील. उड्डाणपुलाच्यावर सुमारे 5.5 मीटर उंचीवरून ही मेट्रो धावणार आहे. रुंदी कमी झाली असली तरी, बांधकामादरम्यान उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना दोन लेन खुल्या ठेवल्या जातील, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे. पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या नियोजनात वारंवार बदल केल्यामुळे, नागरिकांना अनेकदा गैरसोय सहन करावी लागते. सिंहगड रस्त्यावर कोणताही अतिरिक्त खर्च टाळावा, अशी मागणी पुणेकरांनी केली आहे. "अयोग्य नियोजनामुळे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जात आहे. अधिकाऱ्यांनी उड्डाणपुलावरून मेट्रो मार्ग कसा जाईल यासाठी स्पष्ट आराखडा सादर करावा. पुलांच्या बांधकामात झालेल्या चुका लक्षात घेता, हे काम सुरू करण्याआधी प्रशासनाने बदलांबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी" असे रहिवाशांचे मत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 7:22 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांची पुन्हा वाहतूक कोंडी, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल 66 ठिकाणी तोडणार; कारण...


