30000000 रुपये! मुंबईत देशातील सर्वात मोठा 'डीपफेक ट्रेडिंग' घोटाळा, सायबर पोलिसांनाही थक्क केलं

Last Updated:

'डीपफेक ट्रेडिंग' घोटाळा प्रकरणी पोलिसांनी बंगळूरमधील एका नामांकित डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या चार उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

News18
News18
मुंबई :  भारतातील पहिलाच डीपफेक ट्रेडिंग फसवणूक गुन्हा समोर आला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञाचा डीपफेक व्हिडिओ वापरुन नागरिकांना शेअर ट्रेडिंगमध्ये फायद्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 'डीपफेक ट्रेडिंग' घोटाळा प्रकरणी पोलिसांनी बंगळूरमधील एका नामांकित डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या चार उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना अटक केलीय.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इंजिनिअर आणि एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुण आहेत. आरोपींनी त्यांच्या कंपनीच्या फेसबुक ॲड आयडीचा बेकायदेशीर ॲक्सेस आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना, विशेषतः काही चिनी नागरिकांना दिला होता. या ॲक्सेसच्या बदल्यात आरोपींनी सुमारे ३ कोटी रुपये भारतीय आणि दुबई चलनामध्ये स्वीकारल्याचं समोर आलंय..

सायबर क्रेडिट पोलिसांकडून तपास सुरु

सदर आरोपी हे व्हल्युलीप इंडिया सव्हिसेस प्रा.लि. या डिजिटल मार्केटींग कंपनीचे उच्चपदस्थ कर्मचारी आहेत. त्यांनी चायनीज नागरिकांना फेसबुक अॅड आय.डी. चा अॅक्सेस देत त्याबदल्यात साधारण 3 कोटी भारतीय व दुबई चलनाच्या माध्यमातून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. सायबर क्रेडिट पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
advertisement

अटक आरोपींची नावे

जिजिल सॅबेस्टियन ( ४४ वर्ष), दिपायन तपन बानर्जी (३० वर्षे), डॅनियल अरुमुघम (२५ वर्षे) यांना बंगळूरु येथून अटक करण्यात आली आहे. चंद्रशेखर भिमसेन नाईक (वय ४२ वर्षे) याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.

आय.टी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर प्रसारीत केल्याचे आढळून आले. दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाणे, पश्चिम विभाग इथे कलम ३१८(४), ३१९(२), ३३६ (२), ३५६ (२) बीएनएस सह कलम ६६ (क),६६ (ड) आय.टी अॅक्ट गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
advertisement

सायबर सेलचे आवाहन

सायबर सेलचे उपायुक्त पुरषोत्तम कराड यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे की अशा प्रकारे व्हिडिओ पाहताना सत्यता पडताळण्याशिवाय विश्वास ठेवू नये. कष्टाने कमवलेला पैसा अशा लोकांच्या हाती लागू देऊ नका. काही वेळेला अशा ट्रेंडिंच्या ग्रुपमध्ये अॅड केलं जाते अशा ग्रुपपासून लांब राहा, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
30000000 रुपये! मुंबईत देशातील सर्वात मोठा 'डीपफेक ट्रेडिंग' घोटाळा, सायबर पोलिसांनाही थक्क केलं
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement