Navi Mumbai : रस्त्यावर मृत्यूचा तांडव; क्रेनच्या धडकेत एकाचा अंत, थरार पाहून प्रत्यक्षदर्शी हादरले

Last Updated:

Navi Mumbai News : नवी मुंबईतील नारपोली परिसरात क्रेनच्या धडकेत 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. निष्काळजी वाहन चालवल्याप्रकरणी क्रेन चालकाविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18
News18
नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील नारपोली परिसरात शुक्रवारी सकाळी एक दुर्दैवी अपघात घडला. क्रेनच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात मोहन गोमा म्हसकर (वय 54) यांचा जागीच मृत्यू झाला.
क्रेनवरील नियंत्रण सुटल्याने भीषण दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित क्रेन रस्त्यावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. क्रेन वेगात आणि निष्काळजीपणे चालवली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याचदरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या मोहन म्हसकर यांना जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की त्यात म्हसकर गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
या प्रकरणी क्रेन चालक विक्रम देशमुख याच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून क्रेनची तांत्रिक स्थिती आणि अपघाताच्या वेळीचा वेग याबाबत माहिती घेतली जात आहे.
दरम्यान जड वाहनांच्या बेदरकार वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : रस्त्यावर मृत्यूचा तांडव; क्रेनच्या धडकेत एकाचा अंत, थरार पाहून प्रत्यक्षदर्शी हादरले
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement