Maratha reservation : 'हे तात्काळ थांबवा अन्यथा सुप्रीम कोर्टात..' मराठा आरक्षणावरुन गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला इशारा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Maratha reservation : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणावरुन शिंदे सरकारला इशारा दिला आहे.
मुंबई, 18 डिसेंबर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं शिंदे समितीचा दुसरा अहवाल आज (सोमवारी) स्वीकारला. यापूर्वी सरकारने शिंदे समितीला राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारवर निशाणा साधला. जे कायद्यात बसत नाही, ते का करताय? असा सवाल करत हे तात्काळ थांबवा अन्यथा सुप्रीम कोर्टात तक्रार करावी लागेल, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला इशारा
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, महाराष्ट्रात, देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला ममत्व सोडून शासन करण्याचा अधिकार आहे. ही राजेशाही नाही, हुकूमशाही नाही. मंत्रिपदाचा दर्जा माजी न्यायमूर्तींना देण्यात येतोय, त्याचा धिक्कार करतो निषेध करतो. सरकारनं 2 गोष्टी लक्षात घ्याव्या, पांडे वि. भारत सरकार 2017 ला निवाडा आला. केंद्रानं बाजू मांडली त्यात स्पष्ट झालं. विद्यमान न्यायदान करतात. जे स्टेटस दिलंय ते सचिवांचं आहे. ही दस्तुरखुद्द सत्यपरिस्थिती आहे. ते सोशल सायंटिस्ट आहेत का? कारकुनांचं काम, न्यायदानासाठी बसलेत त्यांच्यासाठी ठेवलंय का? न्यायाधीशांची संख्या रोडावली तर निवृत्त न्यायाधीशांना पण बोलावलं जातं. ज्या तत्त्वात आपण बसत नाही तर बाशिंग बांधून आग्रह का करावा? न्यायाधीशांना राजकारणात आणण्याचा का प्रयत्न सुरूय? मंत्र्यांच्या दर्जापर्यंत त्यांना आणणार? तात्काळ हे थांबवा अन्यथा सर्वोच्च न्यायालयात तक्रार करावी लागेल, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
advertisement
लॉ सेटल्ड आहेत. यात ममत्व ठेवण्याची गरज नाही. एका जातीची शाही आहे का? तो जरांगे कितवी पास आहे माहिती नाही, विचारतो आम्ही, हक्कभंद होत नाही का? छगन भुजबळ माळी समाजाचे आहे, त्यांना हिणवलं जातंय. कानात बोळे आहेत का? डोळ्यात माती गेलीय का? 4 थी पासला मेडिकलला ॲडमिशन मिळत नाही जरांगे. वेड्याच्या दवाखान्यात न्या म्हणताय? इतर नेत्यांनी भ्र बोलला तर पोलिसात तक्रार होते, त्यांना अटक होते. त्यांना वेड्याच्या दवाखान्यात न्या हे म्हणणाऱ्या जरांगेंना कधी अटक होणार? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रींनी निर्णय घेण्यापूर्वी एकवेळ विचार केला पाहिजे, असंही सदावर्ते म्हणाले.
advertisement
मी हिंदुस्थानी आहे, हे सरकार जनतेचं आहे, योग्य मागणी सरकारकडे करणं आमचा अधिकार आहे. विरोधकांना उद्धव भाईजानला, संजू मामूला म्हणायचंय, वेडांच्या दवाखान्यात टाका म्हटल्यावर चालतं का? जालन्याचा अंबादास दानवे यांना चालणारे का? विरोधीपक्षाचा अर्थ काय? जरांगेंची परवाची सरकारसोबतची चर्चा पाहिली. गुन्हे मागे घ्या म्हणे, काडतुसं, बंदुका कोणतंही सरकार सुटका करू शकत नाही, डंके की चोट पे सांगतोय जरांगे. निजाम आदिलशाह औरंगजेबाच्या कार्यकाळातल्या सगळ्या नोंदी त्यावर नोटीफीकेशन सरकारला काढताच येत नाही. कुणबी, माळी, साळी, धनगर, लोहार, देववाले, बौद्ध कुणी असेल केवळ छोटे समूह आहेत म्हणून त्यांचा आवाज पोहचत नाही का?
advertisement
मला हा विषय मोठा करायला लावू नका : जरांगे पाटील
सरकारला विरोध नाही. परंतु, गावात शेतमजूर राहतात, पिकाला लावतंय, बांधतंय, पाणी सोडतंय. छोट्या जातसमूहाच्या लोकांनी काय हवा खावी? बागायतदार शेतकऱ्यांचा विचार करू नका. गावातल्या शेतमजूरांचा विचार करा. केवळ त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही म्हणून? जर शेतमजूराचा विचार करत नसाल तर मला हा विषय मोठा होईल. मला विषय मोठा करायला लावू नका आधी शेतमजूर मगच बागायतदार, असंही सदावर्ते शेवटी म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 18, 2023 8:15 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maratha reservation : 'हे तात्काळ थांबवा अन्यथा सुप्रीम कोर्टात..' मराठा आरक्षणावरुन गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला इशारा







