Vande Bharat Train: 'वंदे भारत'च्या प्रवाशांना मोठा दिलासा, वेटिंग लिस्टची कटकट दूर होणार; काय आहे रेल्वेचा प्लॅन?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबई- अहमदाबाद वंदे भारत ट्रेन 20 डब्यांसह धावणार आहे. या ट्रेनला रेल्वेकडून चार अतिरिक्त कोच जोडण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांची वेटिंग लिस्टची कटकट दूर होणार आहे.
मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावर वंदे भारत ट्रेनने कुटुंबीयांसोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची, दररोज प्रवास करणाऱ्यांची, व्यावसायिक प्रवास करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे वेटिंग लिस्ट मोठ्या प्रमाणावर वाढते. खास रेल्वेने या सर्व प्रवाशांसाठी महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. वेटिंग लिस्टची कटकट कायमची संपणार असून प्रवाशांना मुंबई- अहमदाबाद वंदे भारत रेल्वेमध्ये कन्फर्म सीट मिळवण्यासाठी प्रवाशांना अडथळा येणार नाही.
पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी ते 7 मार्च 2026 या दिवसांमध्ये मुंबई- अहमदाबाद वंदे भारत ट्रेन 20 डब्यांसह धावणार आहे. या ट्रेनला रेल्वेकडून चार अतिरिक्त कोच जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांसाठी सीटची क्षमता 278 ने वाढणार आहे. अनेक प्रवाशांची तिकिट वेटिंग लिस्टची कटकट यामुळे कमी होणार आहे. मुंबई सेंट्रल- अहमदाबाद वंदे भारत ट्रेन तात्पुरती 20 कोचसह धावणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता वंदे भारत ट्रेनमध्ये चार अतिरिक्त एसी कोच जोडले गेले आहे. यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. त्याचसोबत त्यांना तिकिटासाठी वाट पाहावी लागणार नाही.
advertisement
मुंबई- अहमदाबाद मार्गावर प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रवाशांकडून अलीकडच्या काळात वंदे भारत ट्रेनची मागणी झपाट्याने वाढत आहे. ट्रेनचा वेग, कमी वेळात प्रवास आणि आरामदायी आसनांमुळे प्रवाशांकडून वंदे भारत ट्रेनला पसंती मिळते. विकेंडच्या दिवसांत आणि सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे या ट्रेनमधून जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ट्रेनची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद जंक्शनदरम्यानचा 491 किलोमीटरचे अंतर वंदे भारत ट्रेन 5 तास 40 मिनिटांमध्ये पार करते. ही ट्रेन वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली या रेल्वे स्थानकावरच थांबते. ज्यामुळे ऑफिसला जाणारे, व्यापारी आणि वारंवार शहरांतर्गत प्रवास करणारे लोकांसाठी ती ट्रेक एक प्रमुख पर्याय बनली आहे.
advertisement
Enhancing passenger convenience! The Train Nos. 22961/22962 Mumbai Central - Ahmedabad Vande Bharat Express will now temporarily run with 20 Coaches (w.e.f 26.01.2026 to 7.03.2026).@RailMinIndia | @drmadiwr | #WRUpdates pic.twitter.com/i8U0hSigzs
— Western Railway (@WesternRly) January 23, 2026
advertisement
ही ट्रेन रविवार वगळता आठवड्यातील सहा दिवस अर्थात सोमवार ते शनिवार धावते. या ट्रेनमध्ये जनरल, तत्काळ, ज्येष्ठ नागरिक आणि महिला कोट्याअंतर्गत तिकिटे बुक करता येतात. ज्यामध्ये एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये बसण्याची सुविधा उपलब्ध आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 3:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Vande Bharat Train: 'वंदे भारत'च्या प्रवाशांना मोठा दिलासा, वेटिंग लिस्टची कटकट दूर होणार; काय आहे रेल्वेचा प्लॅन?










