Askhay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारे पोलीस अधिकारी कोण? सिनेस्टाईल घटना कशी घडली?

Last Updated:

Akshay Shinde Death: पोलीस आरोपी अक्षयला चौकशीसाठी जेलमधून घेऊन जात असताना अक्षयने जीपमधील पोलिसाच्या कंबरेवरील बंदूक हिसकावून तीन राऊंड फायर केले.

अक्षय शिंदे (बदलापूर प्रकरणातील आरोपी)
अक्षय शिंदे (बदलापूर प्रकरणातील आरोपी)
मुंबई : बदलापूरमधील चिमुरडीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे आणि पोलिसांच्या झटापटीत आरोपी अक्षयवर गोळीबार झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांच्या कमरेवरील बंदुकीतून फायरिंग केल्याने पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळीबार केल्याचे सांगितले जाते. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी अक्षयवर गोळीबार केल्याचे समजते.
पोलीस आरोपी अक्षयला चौकशीसाठी जेलमधून घेऊन जात असताना अक्षयने जीपमधील पोलिसाच्या कंबरेवरील बंदूक हिसकावून तीन राऊंड फायर केले. यावेळी दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रत्युरादाखल अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अक्षयला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही वेळातच वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात जाणार असल्याची माहिती आहे.
advertisement
नेमकी घटना कशी घडली?
तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांजवळील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कंबरेवरील बंदूक खेचून निलेश मोरे यांच्यावर अक्षयने 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात गेली तर 2 गोळ्यांचा वेध चुकला.
advertisement
जखमी निलेश मोरेने त्याही परिस्थितीत अक्षय शिंदे याला प्रत्युत्तर दिले. सोबत असलेले दुसरे अधिकारी, पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला. त्यावेळी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली. दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं.
दरम्यान,अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे. पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिलेला नाही.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Askhay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारे पोलीस अधिकारी कोण? सिनेस्टाईल घटना कशी घडली?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement