Uddhav Thackeray : राहुल शेवाळे बदनामी प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाचा मोठा दिलासा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाने मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.
प्रशांत बाग, प्रतिनिधी
मुंबई, 21 ऑगस्ट : खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेली मानहानी याचिका प्रकरणात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या दोघांनाही न्यायालयाने बेल बाँड मंजूर केला आहे. प्रत्येकी 15 हजाराच्या जातमुचलक्यावर दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात एक लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. यात आपल्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याची तक्रार खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. यात राहुल शेवाळे आणि कराचीमधल्या रिअर इस्टेटमध्ये हितसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.
advertisement
काय झालं कोर्टात?
मुंबई शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं होतं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी 15 हजाराच्या जातमुचलक्यावर कोर्टानं जामीन मंजूर केला. सुनावणी दरम्यान व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उद्धव ठाकरे यांना हजर राहण्यासाठी, राहुल शेवाळे यांच्या वकील चित्रा साळुंखे यांनी विरोध केला होता. राहुल शेवाळे यांच्याशी फोनवर संवाद झाल्यानंतर आक्षेप मागे घेतला. यापुढील सुनावणीत उद्धव ठाकरे व्हिसीद्वारे हजर राहणार आहेत.
advertisement
काय होतं प्रकरण?
सामना दैनिकात लेख प्रसिद्ध झाल्यानंतर राहुल शेवाळे यांचे वकिल चित्रा साळुंखे यांनी दैनिक सामनाला यांना नोटीस पाठवून बातमीचा स्त्रोत काय आहे, याचा जाब विचारला. यावर दैनिक सामनाने इंटरनेटवर चर्चा करणाऱ्या एका महिलेकडून हे ऐकलं होतं, आणि त्या आधारावर बातमी दिल्याचं सांगितलं. यानंतर राहुल शेवाळे यांनी मानहानीची तक्रार दाख करत मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला.
advertisement
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर खासदार राहुल शेवाळे हे शिंद गटात सामील झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि खासदार राहुल शेवाळे यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. राहुल शेवाळे सध्या लोकसभेत शिवसेना पक्षाचे नेते म्हणून जबाबदारी सांभाळतात. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एका महिलेने राहुल शेवाळे यांच्यावर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप केलो होते. हे आरोप राहुल शेवाळे यांन फेटाळून लावले. तसंच आपली राजकीय कारकिर्द संपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही राहुल शेवाळे यांनी केला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 21, 2023 3:46 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Uddhav Thackeray : राहुल शेवाळे बदनामी प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाचा मोठा दिलासा










