24 तासांत वळसे पाटलांचा 'त्या' वक्तव्यावरून यु-टर्न; म्हणाले आदरणीय शरद पवारांबाबत...
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. मात्र आता त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यु-टर्न घेतल्याचं पहायला मिळत आहे.
मुंबई, 21 ऑगस्ट : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या इतर आठ नेत्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. या नेत्यांमध्ये दिलीप वळसे पाटील यांचा देखील समावेश आहे. दरम्यान रविवारी शरद पवार यांच्याबद्दल बोलताना वळसे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ‘शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही, परंतू महाराष्ट्रामध्ये त्यांना एकट्याच्या ताकतीवर, त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेने एकदाही बहुमत दिले नाही. एकदाही मुख्यमंत्री केलं नाही' असं वळसे पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र आता वळसे पाटील यांनी 24 तासांमध्येच आपल्या भूमिकेवरून युटर्न घेतला आहे. त्यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कालच्या माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही.
माझे म्हणणे असे होते की एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. ते घडलं नाही त्याबद्दलची खंत मी काल बोलून दाखवली. ही खंत… pic.twitter.com/jHveKLl7Us
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) August 21, 2023
advertisement
नेमकं काय म्हटलं वळसे पाटील यांनी?
'कालच्या माझ्या भाषणात मी कुठेही आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर टीका किंवा काही चुकीचे बोललो नाही. माझे म्हणणे असे होते की एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. ते घडलं नाही त्याबद्दलची खंत मी काल बोलून दाखवली. ही खंत मी केवळ कालच बोलून दाखवली असे नाही. यापूर्वीही पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये तसेच मेळाव्यांमध्ये जाहीरपणे बोललो आहे.
advertisement
माझ्याकडून आदरणीय पवार साहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी जे राजकीय विश्लेषण कालच्या भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, प्रसार माध्यमांनी त्याचा अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला', असं वळसे पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 21, 2023 2:27 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
24 तासांत वळसे पाटलांचा 'त्या' वक्तव्यावरून यु-टर्न; म्हणाले आदरणीय शरद पवारांबाबत...









