मुंबईत यंदा भाजपच ठासून येणार; ठाकरे बंधूंची झोप उडणार; Axis चा धडकी भरवणारा Exit Poll

Last Updated:

मुंबईत भाजप हा मोठा पक्ष ठरणार असून ठाकरेंचं मुंबई महानगरपालिकेचं स्वप्न भंगणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

News18
News18
मुंबई : निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोल्सनी सत्ताधारी मुंबईत भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. ऍक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यानुसार यंदा मुंबईत भाजप हा मोठा पक्ष ठरणार असून ठाकरेंचं मुंबई महानगरपालिकेचं स्वप्न भंगणार असल्याचा अंदाज अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेसाठी अॅक्सिस एक्झिट पोल समोर आला आहे. त्यानुसार भाजप आणि शिंदे यांच्या युतीला 131- 151 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 52-68 जागा मिळतील असं म्हटलंय. दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित आघाडीला 12-16 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी इतर पक्षांना 6-12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement

मतांच्या टक्केवारीतही भाजप आघाडी आघाडीवर

Axis My India च्या पोल ऑफ पोल्सनुसार मतांच्या टक्केवारीतही भाजप आघाडी आघाडीवर असल्याचे दिसते. भाजप आघाडीला 42 ते 44 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना (उद्धव गट) 32 ते 35 टक्के, तर काँग्रेस 13 ते 14 टक्के मतांवर राहू शकते. इतर पक्षांचा वाटा तुलनेने मर्यादित असल्याचे चित्र आहे.
advertisement

पुरुष–महिला मतदानात फारसा फरक नाही

Axis My India च्या आकडेवारीनुसार, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना सुमारे 33 टक्के पुरुष आणि 31 टक्के महिला मते मिळण्याचा अंदाज आहे.

अंतिम निकालाबाबत उत्सुकता कायम

एक्झिट पोल्स हे अंतिम निकाल नसले तरी, सध्या तरी बहुतांश सर्वेक्षणे भाजप आघाडीच्या बाजूने झुकत असल्याचे दर्शवतात. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीत या अंदाजांची कितपत खरे ठरतात याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
advertisement
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका निवडणूक कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरे अशी थेट लढाई झाली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या देशाची अर्थिक राजधानी मुंबई कुणाची? या प्रश्नाचे उत्तर एक्झिट पोलमधून मिळाले आहे. मराठी माणूस, मराठी महापौर, अदाणीकरण हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणत ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिका आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळाले नाही हे या एक्झिट पोलमधून समोर येत आहे. ठाकरे बंधूना धोबीपछाड करत मुंबईत भाजपने मिळवल्याचं समोर आला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत यंदा भाजपच ठासून येणार; ठाकरे बंधूंची झोप उडणार; Axis चा धडकी भरवणारा Exit Poll
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement