BMC Election Exit Poll: ठाकरे बंधूंना किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर

Last Updated:

या एक्झिट पोलमध्ये मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवशक्तीला ३५ टक्के मतदान मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया अखेरीस पूर्ण झाली आहे. २९ महापालिकांसाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचं भवितव्य आता EVM मशीनमध्ये बंद झालं आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान काही ठिकाणी शांतेत तर काही ठिकाणी वादात पार पडलं. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक एक्झिट पोलचे अंदाज आता समोर आला आहे. मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना मात्र धक्का बसला आहे. एक्झिट पोलमध्ये ५९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
नेटवर्क १८ च्या सीएनएन न्यूज मेगा पोलने एक्झिटचाा अंदाज समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवशक्तीला ३५ टक्के मतदान मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. या मतदानाच्या टक्केवारीनुसार, ठाकरे बंधूंना ५९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये शिवसेना आणि मनसे मिळून ५९ जागा मिळणार आहे. मागील 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही स्वतंत्र लढली होती, त्यावेळी ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडलेली नव्हती.
advertisement
पण, यंदाच्या निवडणुकीच मराठीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले. एकत्र आल्यानंतर महापालिकेची निवडणूकही एकत्र लढवण्याची घोषणा केली. दोन्ही ठाकरे बंधूंनी नियोजन करून शाखांमध्ये भेटी आणि मोजक्याच सभा घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. मराठी मतदारांना मुंबई वाचवण्याची हीच शेवटची संधी आहे, असं भावनिक आवाहन केलं होतं. पण, आता हाती आलेल्या एक्झिट पोलमध्ये मतदारांनी ठाकरे बंधूंनी कमी प्रतिसाद दिला आहे.
advertisement
महायुतीला 138 जागांचा अंदाज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाजप आणि शिवसेना महायुतीला १३८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. महायुतीला मुंबईमध्ये ४४ टक्के मत मिळणार असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईचा किंग यंदा हा महायुतीचा होणार, हे एक्झिट पोलच्या अंदाजावरून स्पष्ट होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election Exit Poll: ठाकरे बंधूंना किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement