शेअर बाजारात उद्या गुंतवणूकदारांसाठी ट्रेडिंग डे अलर्ट, निवडणुक सुट्टीचा होणार ‘हाय व्होल्टेज’ इम्पॅक्ट; निकालांनी वाढवली धडधड
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: गुरुवारी शेअर बाजार बंद असतानाच अनेक महत्त्वाच्या कॉर्पोरेट घडामोडी घडल्या आहेत. तिमाही निकाल, मोठ्या घोषणा आणि व्यवहारिक निर्णयांचा थेट परिणाम आता शुक्रवारच्या सत्रात दिसणार आहे.
गुरुवारी शेअर बाजार बंद असल्याने बुधवारच्या बाजार बंदीनंतर आलेल्या या सर्व बातम्यांचा परिणाम आता थेट शुक्रवारच्या सत्रात पाहायला मिळणार आहे. अनेक कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले असून, काही कंपन्यांनी व्यवसायवाढीशी संबंधित मोठ्या घोषणा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचे लक्ष इंफोसिस, आयसीआयसीआय प्रू एएमसी, एचडीबी फायनान्शियल, बीएचईएल, साऊथ इंडियन बँक, जायडस, स्वराज इंजिन्स, बायोकॉन यांच्यासह इतर शेअर्सकडे लागले आहे.
advertisement
Infosys Ltd. इंफोसिसने आर्थिक वर्ष 2026 साठी आपला महसूल वाढीचा अंदाज वाढवून 3% ते 3.5% असा केला आहे. याआधी हा अंदाज 2% ते 3% इतका होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीने कॉन्स्टंट करन्सी आधारावर तिमाही दर तिमाही 0.6% वाढ नोंदवली आहे. बाजाराला या तिमाहीत वाढ जवळपास स्थिर राहण्याची अपेक्षा होती. विशेष म्हणजे, पहिल्या तिमाहीत कंपनीने 2.6% आणि दुसऱ्या तिमाहीत 2.2% वाढ दाखवली होती.
advertisement
advertisement
ICICI Prudential AMC आयसीआयसीआय प्रू एएमसीचा शुद्ध नफा वार्षिक आधारावर 45.1% वाढून 917 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी हा नफा 631.8 कोटी रुपये होता. कंपनीची एकूण उत्पन्न 35.2% वाढून 1,623.5 कोटी रुपये झाली आहे, जी मागील वर्षी 1,201 कोटी रुपये होती. कंपनीने प्रति शेअर 14.85 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Sterling & Wilson स्टर्लिंग अँड विल्सनला या तिमाहीत 2.8 कोटी रुपयांचा शुद्ध तोटा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 14.83 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे रेव्हेन्यू 14% वाढून 2,092 कोटी रुपये झाले असले तरी EBITDA 5% घटून 66.9 कोटी रुपये राहिला आहे. EBITDA मार्जिन 3.8% वरून 3.2% वर घसरले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








