निवडणुका अवघ्या 25 दिवसांवर पण ठाकरे बंधूंचे सूर जुळेना, सगळं ठरलं पण 4 ठिकाणांमुळे वाढला पेच!
- Reported by:PRANALI KAPASE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
शिवसेना उबाठा आणि मनसेत आतापर्यंत 227 पैकी 150 जांगावर चर्चा होऊन तोडगा निघाला आहे.
मुंबई : सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त मात्र काही ठरत नाही. निवडणुका तोंडावर आल्या असून अद्याप ठाकरे बंधूच्या युतीच्या फक्त बैठका सुरू आहेत.
आधी जागावाटप करा, मगच युती? असचं काहीसं सुरू असल्याची चर्चा आहे. सध्या शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीत.. युतीचा भव्य सोहळा होईल असं म्हणता म्हणता 5-6 दिवस निघून गेले आहेत. त्यामुळे आधी जागा वाटप मगच युतीची घोषणा होणार असे दिसून येत आहे.
ठाकरे बंधूमधील चर्चा बऱ्यापैकी पूर्ण होत आली आहे अशी माहिती समोर आली. मात्र वरळी, माहिम शिवडी आणि भांडूप या तीन विधानसभा मतदार संघातील जागांवरून अजून घोडं असल्याचं दिसतय. शुक्रवारी अनिल परब, राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते तरी त्यात तोडगा निघाला नाही. म्हणून आज पुन्हा संजय राऊत यांनी ही राज ठाकरे यांची भेट घेतली. आजही तोडला निघाला नाही तर मात्र रविवारी होणाऱ्या मविआच्या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न तयार होत आहे.
advertisement
जागावाटप अद्याप का नाही?
वरळी , माहिम, शिवडी आणि भांडूप या विधानसभामध्ये असलेल्या मतदार संघात काही जागांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पदाधिकारी इच्छुक आहेत. पडलेल्या आरक्षणानुसार आपल्या पदाधिकारी यांना त्या ठिकाणी निवडणूक लढतां यावी यासाठी दोन्ही नेते आग्रही आहेत. त्यामुळे या तीन मतदार संघातील पेच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाच सोडवावा लागणार आहे.
advertisement
आतापर्यंत किती जागांवार तोडगा निघाला?
शिवसेना उबाठा आणि मनसेत आतापर्यंत 227 पैकी 150 जांगावर चर्चा होऊन तोडगा निघाला आहे. त्यापैकी शिवसेना उबाठा आणि मनसेला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या हे ठरले आहे. पण उर्वरीत जागांपैकी काही जागा या दोन्ही पक्षांना हव्या आहे. विशेषता चार विधानसभा क्षेत्रांना घेऊन वाद होतांना दिसणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती आणि जागावाटपाचा तिढा कसा सुटणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
advertisement
हे ही वाचा :
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 5:48 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
निवडणुका अवघ्या 25 दिवसांवर पण ठाकरे बंधूंचे सूर जुळेना, सगळं ठरलं पण 4 ठिकाणांमुळे वाढला पेच!








