BMC Election 2026: मतदान करा अन् हॉटेलात जेवणावर भरघोस डिस्काऊंट मिळवा, मतदारांना होणार मोठा फायदा

Last Updated:

मतदानासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखी योजना समोर आणली आहे. या योजनेमुळे मतदारांना भरघोस फायदा होणार आहे.

BMC Election 2026: मतदान करा अन् हॉटेलात जेवणावर भरघोस डिस्काऊंट मिळवा, मतदारांना होणार मोठा फायदा
BMC Election 2026: मतदान करा अन् हॉटेलात जेवणावर भरघोस डिस्काऊंट मिळवा, मतदारांना होणार मोठा फायदा
सध्या अनेक महानगरपालिकांमध्ये मतदानाची धामधूम पाहायला मिळतेय. कार्यकर्त्यांसह उमेदवारांचाही आणि राजकीय नेत्यांचाही उत्साह चांगलाच शि‍गेला पोहोचला आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना पगारी सुट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे सर्वांनाच मतदान करणं शक्य आहे. मतदारांसाठी एक गुड न्यूज आहे. मतदानासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखी योजना समोर आणली आहे. या योजनेमुळे मतदारांना भरघोस फायदा होणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रातील संघटना असलेल्या 'आहार' (AHAR) ने मतदारांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे, नेमकी काय मतदारांसाठी खास ऑफर आहे, जाणून घेऊया...
येत्या 15 जानेवारीला 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रामध्ये मतदान पार पडणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रातील संघटना असलेल्या 'आहार' (AHAR) ने मतदारांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर मुंबईकरांसाठी आहे. मुंबईकरांनी मतदान केल्यानंतर त्यांना बार अँड रेस्टॉरटसह सामान्य हॉटेमध्ये खाल्ल्यास किंवा जेवल्यास विशेष सवलतही मिळणार आहे. निवडणुकीचा टप्पा वाढवण्यासाठी आहार संघटनेकडून ही विशेष सवलत ठेवण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने मतदार मतदान करण्याऐवजी पिकनिकला जाणे किंवा घरी राहणे पसंत करतात. ही मानसिकता बदलण्यासाठी महापालिका प्रशासनाने 'आहार' संघटनेशी हा‍तमिळवणी केली आहे.
advertisement
मतदान केल्यानंतर बोटाला लावलेली शाई दाखवल्यानंतर त्या मतदारांना बिलावर विशेष सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या कोणत्याही कोपर्‍यात राहणार्‍या मतदाराला या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. 'आहार' संघटनेकडून मुंबईतील हजारो हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि परमिट रूम्सचे प्रतिनिधित्व केले जाते. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या 'स्वीप' (SVEEP) उपक्रमाला यामुळे मोठे बळ मिळाले आहे. प्रशासनाने यापूर्वीच पथनाट्ये, फ्लॅशमॉब आणि शाळा- महाविद्यालयांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. आता त्यात हॉटेल व्यावसायिकांनी उडी घेतल्याने मतदानाचे वातावरण अधिकच रंजक झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election 2026: मतदान करा अन् हॉटेलात जेवणावर भरघोस डिस्काऊंट मिळवा, मतदारांना होणार मोठा फायदा
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement