Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; पगार 46,000 रुपये, वाचा अटी- शर्ती
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठामध्ये सिस्टिम ऑफिसर पदासाठी नोकरभरती केली जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठामध्ये सिस्टिम ऑफिसर पदासाठी नोकरभरती केली जात आहे. एकूण 83 पदांसाठी ही नोकरभरती केली जाणार असून अलीकडेच नोकरभरतीसाठीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्रतेचे निकष आणि आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. जाहिरातीमध्ये नेमके कोणकोणत्या पात्रता नमूद करण्यात आल्या आहेत, जाणून घेऊया...
मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिस्टिम ऑफिसर पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे. या नोकरभरतीमध्ये सिस्टिम ऑफिसर आणि सिनियर सिस्टिम ऑफिसर पदांवर एकूण 83 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सिस्टिम ऑफिसर पदासाठी 54 रिक्त जागा असून सिनियर सिस्टिम ऑफिसर पदासाठी 29 रिक्त जागा आहेत. दोन्हीही पदांसाठी अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2026 ही आहे. 15 जानेवारी पर्यंत इच्छुक अर्जदाराने सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत अर्ज दाखल करायचा आहे.
advertisement
सिस्टिम ऑफिसर आणि सिनियर सिस्टिम ऑफिसर पदांसाठी पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे. सिस्टिम ऑफिसर पदासाठी उमेदवाराचं B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA चं शिक्षण पूर्ण हवं, नेटवर्क प्रमाणपत्राची आवश्यकता आहे किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर), RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्राची आवश्यकता आहे आणि संबंधित विभागाचा उमेदवाराकडे वर्षभराचा अनुभव आवश्यक आहे.
advertisement
सिस्टिम ऑफिसर आणि सिनियर सिस्टिम ऑफिसर पदासाठीची जाहिरात:- https://drive.google.com/file/d/1oBz796nWklreXGRcaQMef9a49xYBmXak/view
सिस्टिम ऑफिसर आणि सिनियर सिस्टिम ऑफिसर पदासाठीची ऑनलाईन अर्जाची लिंक:- https://bhc.gov.in/bhcsysadmin/
सिनियर सिस्टिम ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे B.E./ B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA आवश्यक आहे. नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. शिवाय, संबंधित विभागाचा 05 वर्षांच्या अनुभवाची गरज आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्जदारांना फी भरायची नाही. सर्वांनाच सरसकट मोफत आहे.
advertisement
सिस्टिम ऑफिसर आणि सिनियर सिस्टिम ऑफिसर पदांसाठी 40,000 ते 46,000 रूपये इतका पगार असणार आहे. 29 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत अर्जदाराने 40 वर्षे पूर्ण केलेले असावे. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जाची आणि ऑनलाईन जाहिरातीची लिंक अर्जदारांना बातमीमध्ये देण्यात आली आहे. त्याप्रमाणे अर्जदारांनी अर्ज भराचा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 2:51 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; पगार 46,000 रुपये, वाचा अटी- शर्ती









