Job Opportunitie : प्रोफेसर व्हायचं स्वप्न पूर्ण होणार; मोठी भरती जाहीर, जाणून घ्या अर्ज कुठे अन् कसा करावा?

Last Updated:

Jobs Recruitment : सीबीएसईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा.

News18
News18
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे 'CBSE 'अंतर्गत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. शैक्षणिक, प्रशासकीय तसेच तांत्रिक क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.
सीबीएसईकडून ग्रुप ए, बी आणि सी अंतर्गत एकूण 224 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये असिस्टंट सेक्रेटरी, असिस्टंट प्रोफेसर,असिस्टंट डायरेक्टर (ट्रेनिंग), असिस्टंट प्रोफेसर/असिस्टंट डायरेक्टर (स्किल एज्युकेशन), अकाउंट्स ऑफिसर, सुपरिंटेंडंट, ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनिअर अकाउंटंट, ज्युनिअर असिस्टंट अशा अनेक पदांचा समावेश आहे.
शेवटची तारीख कोणती?
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रात शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही संधी करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.
advertisement
शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना सीबीएसईसारख्या प्रतिष्ठित संस्थेत कार्य करण्याची संधी मिळणार आहे. या नोकरीमुळे व्यावसायिक अनुभव वाढेल, कौशल्यांचा विकास होईल आणि भविष्यातील करिअरसाठी मजबूत पाया तयार होईल.
अर्ज कसा करावा?
1)पहिल्यांदा तर www.cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2)होमपेजवर उपलब्ध असलेल्या भरतीविषयक लिंकवर क्लिक करा.
3)नवीन उमेदवारांनी प्रथम रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
advertisement
4)नोंदणीनंतर लॉग इन करून अर्जाचा फॉर्म उघडा.
5)फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
6)आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा.
7)अर्जाची एक प्रिंटआउट तुमच्याकडेही असणे आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Job Opportunitie : प्रोफेसर व्हायचं स्वप्न पूर्ण होणार; मोठी भरती जाहीर, जाणून घ्या अर्ज कुठे अन् कसा करावा?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement