Central Railway: नागपूर, कोल्हापूर ते बनारस, मुंबईतून गुरुवारी 10 विशेष ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Central Railway: दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मुंबईतून विविध शहरांसाठी 10 विशेष रेल्वे धावणार आहेत.
मुंबई: दिवाळी आणि छठ या पारंपरिक सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने विशेष तयारी केली आहे. या निमित्ताने 30 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई विभागातून एकूण 10 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून विविध दिशांना सुटणार असून उत्तर व दक्षिण भारतातील प्रमुख शहरांना जोडतील.
सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्या:
गाडी क्र. 01011 सीएसएमटी–नागपूर विशेष मध्यरात्री 12.20 वाजता सुटेल. गाडी क्र. 01031 सीएसएमटी–बनारस विशेष सकाळी 07.35 वाजता सुटेल. दुपारी 02.30 वाजता गाडी क्र. 01417 सीएसएमटी–कोल्हापूर विशेष सुटेल तर दुपारी 03.00 वाजता 01047 सीएसएमटी–दानापूर विशेष मार्गस्थ होईल. रात्री 10.30 वाजता 01079 सीएसएमटी–गोरखपूर विशेष सुटेल. या सर्व गाड्या महाराष्ट्रातील तसेच उत्तर भारतातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार असून, वातानुकूलित, शयनयान व सामान्य डब्यांसह रक्षक ब्रेकव्हॅनची सुविधा उपलब्ध असेल.
advertisement
एलटीटीहून सुटणाऱ्या गाड्या
गाडी क्र. 02139 एलटीटी–नागपूर विशेष रात्री 12.25 वाजता, तर 01143 एलटीटी–दानापूर विशेष सकाळी 10.30 वाजता सुटेल. 01051एलटीटी–बनारस विशेष दुपारी 12.15 वाजता सुटेल. दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी 01463 एलटीटी–तिरुवनंतपूरम विशेष दुपारी 04.00 वाजता सुटेल, तर 03380 एलटीटी–धनबाद विशेष सायंकाळी 05.०० वाजता सुटेल.
advertisement
या सर्व विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित द्वितीय व तृतीय श्रेणी, शयनयान आणि सामान्य डबे ठेवण्यात आले आहेत. काही गाड्यांमध्ये जनरेटर कोचची सुविधा देखील असेल.
प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक गाडीचे तपशीलवार वेळापत्रक आणि थांबे www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर किंवा NTES App वर पाहता येतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 12:07 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway: नागपूर, कोल्हापूर ते बनारस, मुंबईतून गुरुवारी 10 विशेष ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक


