advertisement

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! होळीला धावणार 186 स्पेशल ट्रेन, कधी आणि कुठं? संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

Central Railway: होळीसाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. विविध मार्गांवर 186 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! होळीला धावणार 186 स्पेशल ट्रेन, कधी आणि कुठं? संपूर्ण वेळापत्रक
Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! होळीला धावणार 186 स्पेशल ट्रेन, कधी आणि कुठं? संपूर्ण वेळापत्रक
मुंबई: मध्य रेल्वेने होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एकूण 186 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 94 होळी विशेष गाड्या आणि 92 नियमित विशेष गाड्यांचा समावेश आहे. मुंबई-नागपूर, सावंतवाडी रोड, बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूर तसेच पुणे-नागपूर, हजरत निजामुद्दीन आणि दानापूर या प्रमुख मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.
विशेष सेवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर दरम्यान आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी, सीएसएमटी-सावंतवाडी रोड साप्ताहिक सेवा, सीएसएमटी-गोरखपूर दैनंदिन सेवा तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड आणि बनारस विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय समस्तीपूर आणि दानापूर मार्गावरही अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. पुणे-नागपूर, पुणे-दानापूर, पुणे-गोरखपूर, पुणे-गाझीपूर सिटी आणि पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गांवरही विशेष गाड्या उपलब्ध असतील.
advertisement
कोकण रेल्वे मार्गावर होळीनिमित्त विशेष सोय करण्यात आली असून मुंबई-सावंतवाडी रोड दरम्यान एकूण 8 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. मुंबई सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येकी दोन फेऱ्या (दोन्ही बाजूंनी) धावतील, ज्यामुळे शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी रोड विशेष (01171/01172) ही गाडी 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मध्यरात्री 12:20 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 12:30 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती संध्याकाळी 5:20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3:45 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबे असतील.
advertisement
लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड (01119/01120) विशेष गाडी 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी रात्री 10:15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. परतीची गाडी 27 फेब्रुवारी आणि 6 मार्च रोजी संध्याकाळी 5:20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4:05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! होळीला धावणार 186 स्पेशल ट्रेन, कधी आणि कुठं? संपूर्ण वेळापत्रक
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement