advertisement

Indian Railway : दक्षिण भारतात जाणाऱ्या या रेल्वेचं तिकीट बुक केलंय? मग ही अपडेट तुमच्यासाठी

Last Updated:

Train Update 2026 : दक्षिण भारतात जर तुम्ही ट्रेनने जर मुंबईहून प्रवास करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, अन्यथा प्रवास करताना काही समस्या येऊ शकतात.

Dadar to Tirunelveli train terminal change April 2026
Dadar to Tirunelveli train terminal change April 2026
मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. जिथे मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तांत्रिक कारणांमुळे दादर-तिरुनेलवेल्ली-दादर साप्ताहिक एक्स्प्रेसच्या टर्मिनस स्थानकात बदल केला आहे. नेमका बदल काय असेल आणि प्रवाशांना कधीपासून या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे.
रेल्वे वेळापत्रकात मोठा फेरबदल
मिळालेल्या माहितीनुसार, दादर-तिरुनेलवेल्ली-दादर साप्ताहिक ही गाडी दादरऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहे आणि परतीच्या प्रवासातही शेवटचे स्थानक लोकमान्य टिळक टर्मिनसच असेल.
जाणून घ्या गाडीची वेळ
गाडी क्रमांक 22629 (लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुनेलवेल्ली) दर गुरुवारी रात्री 8.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रवाना होईल. ही गाडी रात्री 9.02 वाजता ठाणे स्थानकावर पोहोचेल आणि 9.05 वाजता पुढे जाईल. तिरुनेलवेल्ली येथे ही गाडी शनिवारी पहाटे 3.55 वाजता पोहोचणार आहे.
advertisement
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 22630 तिरुनेलवेल्ली येथून दर बुधवारी सकाळी 7.30 वाजता सुटेल आणि गुरुवारी दुपारी 3.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
बदल कधी पासून लागू होणार?
हा बदल गाडी क्रमांक 22630 साठी 15 एप्रिल 2026 पासून आणि गाडी क्रमांक 22629 साठी 16 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. पनवेल ते तिरुनेलवेल्ली या मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांनी नव्या टर्मिनसची नोंद घेऊन नियोजन करावे असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Indian Railway : दक्षिण भारतात जाणाऱ्या या रेल्वेचं तिकीट बुक केलंय? मग ही अपडेट तुमच्यासाठी
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement