केक कापायला घेऊन गेले अन् जिवंत जाळलं, हाफ मर्डर गुन्हा दाखल करा; अब्दुलच्या वडिलांची मागणी

Last Updated:

21 वर्षीय तरुणाला त्याच्याच मित्रांनी पेट्रोल टाकून जळल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे.या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

News18
News18
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील कुर्ला भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बर्थडेचा केक कापायला मित्राला घराखाली बोलवलं अन् पेट्रोल टाकून त्याला जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अब्दुल रहमान मकसूद आलम खान असे या तरुणाचे नाव आहे. 21 वर्षीय तरुणाला त्याच्याच मित्रांनी पेट्रोल टाकून जळल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
बर्थडे साजरा करायचा म्हणून मित्रांनी घरा खाली बोलावलं म्हणून अब्दुल खाली गेला पण केक कापण्याआधीच त्याच्या मित्रांनी त्याला दगड सदृश गोष्टीने मारलं आणि पेट्रोल टाकून जाळलं. अब्दुलने कसाबसा आपला जीव वाचवला. सध्या त्याच्यावर कुर्ल्यातील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून जवळपास 30 ते 35 टक्के भाजला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच या घटनेमागे नेमकं काय कारण आहे, याचा तपास करत आहे.
advertisement

रुग्णालयात उपचार सुरू 

हा प्रकार इतका अचानक घडला की अब्दुलला काहीही समजण्याअगोदर जाळण्यात आले. आगीने होरपळलेल्या अवस्थेत तो मदतीसाठी आरडाओरडा करत होता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. काहींनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. गंभीर भाजल्या गेलेल्या अवस्थेत अब्दुलला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
advertisement

कुर्ला पोलीस घटनास्थळी दाखल

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात आरोपी आणि जखमी तरुण यांच्यात पूर्वी काही वाद होते का, याचाही शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून लवकरच दोषींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी असून तरुणाईमध्ये वाढत चाललेल्या हिंसक प्रवृत्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.
advertisement

 हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अब्दुल आणि त्याच्या मित्रांमध्ये कोणतं वैर किंवा भांडण नव्हतं पण असं कां केलं हे काळत नाही. पण हा हत्येचा कट असल्याचा संशय आहे. मस्तीत केलं असतं तर त्यांनी आग विझवली असती पण जाळून पळून का गेले? असा सवाल अब्दुलचा भाऊ हसीब याने उपस्थित केला आहे.  अब्दुलच्या वडिलांनी त्या सर्व मुलांवर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
केक कापायला घेऊन गेले अन् जिवंत जाळलं, हाफ मर्डर गुन्हा दाखल करा; अब्दुलच्या वडिलांची मागणी
Next Article
advertisement
BMC Election : जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समोर...
जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? BMC निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो
  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

  • जे ठाकरेंना समजलं, ते काँग्रेसला कळणार का? बीएमसी निवडणुकीआधी धक्कादायक आकडे समो

View All
advertisement