Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी 5000 जादा बस, कधी सुरू होणार बूकिंग?

Last Updated:

Ganesh Festival: कोकणचा गणेशोत्सव प्रसिद्ध असून लाखो चाकरमानी या काळात मुंबईतून गावी जात असतात. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने 5 हजार जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी 5000 जादा बस, कधी सुरू होणार बूकिंग?
Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी 5000 जादा बस, कधी सुरू होणार बूकिंग?
मुंबई: गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतून अनेक चाकरमानी कोकणात जात असतात. याच चाकरमान्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीने एक खूशखबर दिलीये. मुंबई, ठाणे व पालघरमधील चाकरमान्यांसाठी यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5 हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 27 तारखेपर्यंतच्या नियमित 597 बस दोन महिन्यांपूर्वीच फुल्ल झाल्या असून, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई सेंट्रल आणि परळ डेपोमधून कोकण मार्गावर रोज 12 बस धावतात. तसेच ठाणे आणि पालघरमधूनदेखील कोकणात जाण्यासाठी नियमित बस असतात. या बसचे बुकिंग 23 जून ते 27 जून या कालावधीमध्ये फुल्ल झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त 5 हजार बसची तरतूद करण्यात आली आहे. या बसचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, 22 जुलैपासून जादा बसेसमधील गट आरक्षणाला सुरुवात होणार आहे. यामध्ये इतर व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सवलती देखील मिळणार आहेत.
advertisement
सुरक्षित वाहतुकीसाठी एसटीची तयारी
गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी एसटी प्रयत्नशील आहे. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बसस्थानक व बसथांब्यावर कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकेदेखील तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे गणपती उत्सवात कोकणात जाताना बसने आरामदायी प्रवास होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी खूशखबर! गणेशोत्सवासाठी 5000 जादा बस, कधी सुरू होणार बूकिंग?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement