तुम्ही माटुंग्यातला 'हा' फेमस चहा प्यायलाय? दिवसाला विक्री होते 600 कप चहाची
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
या चहामध्ये केवळ 2 टक्के पाण्याचा वापर केला जातो, बाकी पूर्ण दुधाचा हा चहा असतो. इथं एकदा चहा प्यायलेली व्यक्ती याठिकाणी पुन्हा येते.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : चहा म्हणजे अनेकजणांसाठी अगदी जीव की प्राण असतो. त्यात पावसाळ्यात गरमागरम वाफाळता चहा पिणं म्हणजे जीवाला अगदी आल्हाददायक आनंद मिळतो. म्हणूनच विविध चहाच्या दुकानांमध्ये, टपरीवर चहाप्रेमींची गर्दी दिसते. माटुंग्यात स्ट्रीट फूडची अनेक दुकानं आणि विविध हॉटेल प्रसिद्ध आहेत. इथं रजवाडी चहाचं दुकानही प्रचंड फेमस आहे. याठिकाणी चहा पिण्यासाठी कॉलेजला आणि ऑफिसला जाणाऱ्यांची वर्दळ असते.
advertisement
या चहामध्ये केवळ 2 टक्के पाण्याचा वापर केला जातो, बाकी पूर्ण दुधाचा हा चहा असतो. इथं एकदा चहा प्यायलेली व्यक्ती याठिकाणी पुन्हा येते. विशेष म्हणजे इथल्या चहाच्या मसाल्याची चवच भन्नाट लागते असं ग्राहक सांगतात. शिवाय या दुकानात स्वच्छताही व्यवस्थित असते. रजवाडी चहाच्या दुकानात जम्बो चहा, कुलर चहा, कॉफी, केशर उकाळा, लेमन टी, असे विविध पेय मिळतात. म्हणूनच हे दुकान लोकप्रिय आहे.
advertisement
रजवाडी चहा या दुकानाची सुरुवात 2021 साली रोहित पटेल या तरुणानं केली. सुरुवातीला बजेट कमी असल्यामुळे तो दिवसाला फार कमी चहा विकायचा. पुढे व्यवसाय वाढत गेला आणि माटुंग्यात सर्वांना रजवाडी चहा आवडत गेला. आता त्यानं चहाची क्वांटिटी वाढवली आहे. सध्या या दुकानात दिवसाला 500 ते 600 हून अधिक कप चहा विकला जातो. ज्यातून उत्तम कमाई होते.
advertisement
'मी 2021 मध्ये चहाच्या व्यवसायाला सुरुवात केली. हळूहळू लोकांना चहा आवडत गेला म्हणून मी चहाची क्वांटिटी वाढवली. आता अनेक लोक येऊन चहा मस्त झाला असं सांगतात तेव्हा बरं वाटतं', असं रजवाडी चहाचा मालक रोहित पटेल यानं सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 29, 2024 8:41 PM IST