Aadhaar Card: 99 टक्के लोक 'या' नियमामुळे फसतात; आधार कार्डमध्ये नाव बदलण्याची अचूक मर्यादा काय आहे; जाणून घ्या
Last Updated:
Aadhaar Card Update Rules : आपल्यापैंकी प्रत्येकाकडे त्याचे वयक्तिक आधारकार्ड असते. मात्र हे कार्ड वापरत असताना तुम्हाला या बद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहे का? चला तर त्यापैंकी एक महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक अनिवार्य ओळखपत्र आहे. देशातील जवळपास 140 कोटींपेक्षा जास्त लोकांकडे आधार कार्ड आहे, जे शाळा, बँकिंग, सरकारी योजना, मोबाईल कनेक्शन आणि विविध सरकारी तसेच खाजगी कामांसाठी अनिवार्य ठरते. आधार कार्ड नसल्यास अनेक महत्वाच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.
तुम्हाला वेळोवेळी आधार कार्डवरील माहिती अपडेट करावी लागते. जसे की जर घराचा पत्ता बदलला असेल, फोन नंबर बदलला असेल, किंवा नावामध्ये काही चूक असेल तर ती वेळेत दुरुस्त करणे आवश्यक असते. जर चुकीची माहिती असल्यास अनेक सरकारी आणि खाजगी कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.
UIDAI अर्थात युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया तुम्हाला आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करण्याची सुविधा देते. तुम्ही हे काम ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करू शकता. आधारमध्ये तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर यासारखी माहिती अपडेट करू शकता.
advertisement
कोणती माहिती आपण एकदाच बदलू शकतो
परंतु काही माहिती अपडेट करण्यावर मर्यादा आहे. UIDAI च्या नियमानुसार आधार कार्डमधील काही महत्त्वाची माहिती फक्त एकदाच बदलता येते. उदाहरणार्थ, नाव, जन्मतारीख आणि लिंग ही माहिती तुम्ही फक्त एकदाच बदलू शकता. जर चुकीची माहिती दिली आणि बदलून घेतली तर पुन्हा बदलता येणार नाही. त्यामुळे नाव, जन्मतारीख आणि लिंग अपडेट करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
पत्ता तुम्ही कितीही वेळा बदलू शकता. मोबाईल नंबरही सुलभपणे बदलता येतो, पण त्यासाठी तुमच्या नवीन नंबरवर OTP येणे आवश्यक असते. UIDAI ने ही मर्यादा लावण्यामागे कारण असे आहे की, अनेकदा माहिती दुरुस्त करण्याचे कारण चुकीच्या उद्देशासाठी वापरले जाते. चुकीची माहिती किंवा बारकाईने न पाहता अपडेट केल्यास तुमच्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो.
advertisement
म्हणूनच आधार अपडेट करताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक तपासा. ऑनलाइन अपडेट करताना अधिकृत UIDAI वेबसाईट किंवा मोबाइल अॅप वापरा. ऑफलाइन अपडेटसाठी आधार सेंटरमध्ये जा आणि वैध कागदपत्रांसह अर्ज करा. सुरक्षिततेसाठी कोणत्याही तृतीय पक्षाला तुमची माहिती देऊ नका.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 9:12 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Aadhaar Card: 99 टक्के लोक 'या' नियमामुळे फसतात; आधार कार्डमध्ये नाव बदलण्याची अचूक मर्यादा काय आहे; जाणून घ्या