Mumbai-Ayodhya flights : या तारखेपासून सुरू होणार मुंबई ते अयोध्येची फ्लाइट; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Mumbai-Ayodhya flights : इंडिगोने सर्वप्रथम दिल्ली ते अयोध्येसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार इंडिगो 15 जानेवारीपासून मुंबई ते अयोध्येसाठी विमानसेवा सुरू करणार आहे.
मुंबई, 26 जानेवारी : अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. लोक मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत. अयोध्येला आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी देखील वाढवली जात आहे. दिल्लीनंतर आता मुंबईहूनही अयोध्येसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. अयोध्येतील विमानतळ सुरू झाल्यापासून विमान कंपन्या या धार्मिक नगरीला उड्डाणे सुरू करत आहेत.
खाजगी विमान कंपनी इंडिगोने सर्वप्रथम दिल्ली ते अयोध्येसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली होती. आता इंडिगो मुंबई ते अयोध्येसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. इंडिगोने आज 15 जानेवारीपासून मुंबई आणि तीर्थक्षेत्र अयोध्या दरम्यान दररोज उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे.
काय असेल वेळापत्रक?
इंडिगोने शेअर केलेल्या वेळापत्रकानुसार, मुंबईहून अयोध्येला जाणारे विमान दुपारी 12:30 वाजता सुटेल आणि 2:45 वाजता अयोध्येला पोहोचेल, तर अयोध्येहून विमान दुपारी 3:15 वाजता निघून मुंबईला 5:40 वाजता पोहोचेल.
advertisement
यापूर्वी, एअरलाइन कंपनी इंडिगोने जाहीर केले होते की ते 6 जानेवारीपासून दिल्ली ते अयोध्या आणि 11 जानेवारीपासून अहमदाबाद ते अयोध्या थेट उड्डाण चालवतील. इंडिगोचे ग्लोबल सेल्स हेड विनय मल्होत्रा म्हणाले, “या नवीन मार्गांमुळे या भागातील प्रवास, पर्यटन आणि व्यापाराला लक्षणीय चालना मिळेल, आर्थिक वाढीला हातभार लागेल आणि पर्यटकांना अयोध्येत थेट प्रवेश मिळेल.
advertisement
अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
वाचा - राम मंदिराचे 14 स्वर्ण जडीत दरवाजे होताय तयार! पाहा प्राण प्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत कशी सुरुये तयारी
रेल्वे आणि विमानाची तिकिटेही महागली
हॉटेल्ससोबतच ट्रेन आणि फ्लाइटची तिकिटेही खूप महाग झाली आहेत. विजय तिवारी सांगतात की, अयोध्येसाठी अनेक गाड्या असल्या तरी 20, 21 आणि 22 जानेवारीला जेव्हा श्री रामजन्मभूमी मंदिराचे उद्घाटन आहे, तेव्हा सर्व गाड्या खचाखच भरलेल्या असतील. परिस्थिती अशी आहे की अयोध्या एक्स्प्रेस ट्रेन उपलब्ध असली तरी जवळपास 80 गाड्यांची वेटिंग लिस्ट आहे, ज्यात कन्फर्म होणे कठीण आहे. फ्लाइट्सबद्दल बोलायचे तर, अयोध्या विमानतळाचे उद्घाटन यावर्षी 30 डिसेंबर रोजी होणार आहे, त्यामुळे सध्या अयोध्येसाठी फक्त दोनच उड्डाणे सुरू आहेत. एक एअर इंडिया आणि दुसरी इंडिगो, पण 20-21 तारखेला फ्लाईट तिकीट उपलब्ध असले तरी त्यांची किंमत 15,000 रुपयांपर्यंत आहे आणि त्यातही एक ते दोन जागा उपलब्ध आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 26, 2023 10:49 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai-Ayodhya flights : या तारखेपासून सुरू होणार मुंबई ते अयोध्येची फ्लाइट; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक