जपानी पद्धतीचे अन् सर्वांना आपलेसे करणारं चिंचोली उद्यान, गजबजलेल्या मुंबईतील एक शांत ठिकाण, VIDEO

Last Updated:

गजबजलेल्या वस्त्या असलेल्या मुंबईत असेही एक पावसाळ्यातील शांत ठिकाण आहे, यावर कदाचित काही जणांचा विश्वासही बसणार नाही. पावसाळ्यात तर या उद्यानाचे निसर्गरम्य वातावरण तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे करते.

+
चिंचोली

चिंचोली उद्यान

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये एक खास उद्यान आहे, हे उद्यान संपूर्णपणे जपानी पद्धतीने बनवण्यात आलेले आहे. झेन संकल्पनेवर आधारलेले चिंचोली उद्यान म्हणजे शांततेचा एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. गजबजलेल्या वस्त्या असलेल्या मुंबईत असेही एक पावसाळ्यातील शांत ठिकाण आहे, यावर कदाचित काही जणांचा विश्वासही बसणार नाही. पावसाळ्यात तर या उद्यानाचे निसर्गरम्य वातावरण तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे करते.
advertisement
जपानी शिल्पशैलीची छाप असणारे पुतळे, वृक्ष आणि हिरवळीची आगळीवेगळी रचना, यामुळे हे उद्यान प्रेक्षणीय ठरते. मोकळ्या हवेत व्यायाम करण्यासाठी, मुलांना खेळता यावे म्हणून, निवांतपणे वाचन करण्यासाठी, मानसिक शांतता मिळवण्यासाठी, मित्रांना भेटण्यासाठी अशा अनेक कारणांनी परिसरातील आणि संपूर्ण नवी मुंबईतीलच रहिवाशांची पावले या उद्यानाकडे आपोआपच वळतात.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर 5 येथील चिंचोली उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे. जपानमधील झेन संकल्पनेनुसार या उद्यानाची रचना करण्यात आली आहे. या उद्यानात पहाटे पाचपासूनच फेरफटका मारणाऱ्यांची आणि व्यायाम करणाऱ्या तरुणांची गर्दी असते. उद्यान अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असल्यामुळे इथे यायला सगळ्यांनाच आवडते. उद्यानात आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली आहे. त्यामुळे मन प्रसन्न होते. उद्यानात आल्यानंतर जपानमधील एखाद्या उद्यानात पोहोचल्याचा भास होतो.
advertisement
जीवनशैलीत करा फक्त हे 5 बदल अन् लठ्ठपणाला करा बाय बाय, महत्त्वाची माहिती..
जपानी पद्धतीचे पुतळे उद्यानात आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी एक अ‍ॅम्फिथिएटरसुद्धा आहे. तर चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांसाठी मार्ग तयार करण्यात आला असून तिथे आकर्षक लाद्या बसवण्यात आल्या आहेत. त्यावर मॅट टाकण्यात आले आहे. लहान मुलांसाठी आकर्षक आणि कल्पक खेळणी आहेत. त्यामुळे सकाळी अनेक आई-बाबा आपल्या मुलांना घेऊन इथे येतात. त्यांचाही व्यायाम होतो आणि मुलांना मोकळ्या हवेतही खेळता येते.
advertisement
'आम्ही ज्येष्ठ नागरिक इथे नेहमी येत असतो. या उद्यानात आल्यामुळे मनाला आनंद आणि शांती मिळते. नवी मुंबईतील हे एक सुंदर आणि निसर्गरम्य उद्यान आहे,' असे चिंचोली उद्यानात रोज येणाऱ्या राजाराम घाडी यांनी सांगितले.
advertisement
या उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रसुद्धा आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी कॅरम, चेस यासारखे खेळ खेळतात. उद्यान आकर्षक असल्यामुळे तिथे महाविद्यालयातील तरुणांचे घोळके येतात. यासोबतच संध्याकाळी आई-बाबा किंवा आजी-आजोबांबरोबर अनेक लहान मुले खेळ खेळण्यासाठी इथे येतात. त्यांच्या किलबिलाटाने उद्यान गजबजून जाते.
advertisement
तुम्हालाही जर एखाद्या सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात शांतता अनुभवण्यासाठी जायची इच्छा असेल तर इथे एकदा तरी याठिकाणी नक्की येऊ शकतात.
मराठी बातम्या/मुंबई/
जपानी पद्धतीचे अन् सर्वांना आपलेसे करणारं चिंचोली उद्यान, गजबजलेल्या मुंबईतील एक शांत ठिकाण, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement