Pawar Family : अजितदादा-शरद पवार भेट, जयंत पाटलांनी एका वाक्यात संपवला विषय
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pawar Family : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई, 10 नोव्हेंबर : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून गोविंदबागेत दिवाळीला हजर राहणार नसल्याचे एक प्रकारे स्पष्ट केलं होतं. पण आज पुण्यात प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार आणि अजितदादा एकत्र आले होते. शरद पवार पोहोचल्यानंतर जवळपास अर्धा तास अजित पवार तिथेच होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर विचारले असता जयंत पाटील म्हणाले, की पवार कुटुंबियांनी काय करावे या बद्दल मी बोलणे योग्य नाही. मी पार्टीचा प्रदेश अध्यक्ष आहे. पार्टीबद्दल काही असेल तर बोला. कोणी कोणाला भेटावे याबद्दल मी काय बोलू. मला त्यावर भाष्य करायचे नाही. कुटुंबाने कुठे भेटावे काय करावे यावर आपण किंवा कुणी भाष्य करावे असे मला वाटत नाही, असं बोलत पाटील यांनी विषय संपवला.
advertisement
पाटील पुढे म्हणाले, की एकनाथ खडसे यांची प्रकृती फारच उत्तम आहे. ताजेतवाणे वाटत होते. कदाचित परवाच डिसचार्ज होईल. बहुतेक सगळे मुद्दे ग्राह्य धरलेत. ते सगळे कागदावर आहेत. कारण 10 वर्षाच्या मुलाचे प्रतिज्ञापत्र, झोमॅटो डीलेव्हरी करणाऱ्याचे प्रतिज्ञापत्र, हाऊसवाईफ असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. एका जिल्ह्यात 32 जिल्हाधियक्ष म्हणून प्रतिज्ञापत्र दिले आहेत. जे पक्षाशी संबंधित नाही. ज्यांना प्रतिज्ञापत्र कशासाठी देतो हेही माहिती नाही. तर बरेचसे प्रतिज्ञापत्र खरे नाही किंवा बोगस आहेत, असे निवडणुक आयोगाला वाटले. ती बाब अतिशय गंभीरच आहे. त्यामुळे निवडणुक आयोग ते ग्राह्य धरेल असे वाटते.
advertisement
सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला आहे की बहुसंख्य आमदार कुठे जातात त्याच्या मागे पक्ष जातो असे नाही. तर बहुसंख्य कॅडर कुठे आहे यावर पक्ष अवलंबून आहे. त्यामुळे सुप्रिम कोर्टाने त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे मला वाटत नाही की सुप्रिम कोर्टाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून निर्णय दिला जाईल. दिलाच तर पुढची पायरी आहे.
advertisement
सरकारमध्येच मतभेद : जयंत पाटील
सरकारमध्येच मतभेद आहेत, काही ओबीसींना चुचकारत आहे तर काही मराठ्यांना चुचकारत आहेत. दोन्ही दरडींवर पाय ठेवण्याचा विचार असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की तुम्ही एका ठिकाणी बसा आणि निर्णय करा. कोणाच्यातरी भावना दुखावायच्या नाही पण मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल काय करणार, ओबीसींचे काय करणार? धनगर समाजाचे आरक्षणाचे मुद्दा आहे. जे अतिशय महत्वाच्या मुद्यावर जे दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत नाही, त्यांनीही बोलले पाहीजे.
advertisement
कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून आम्ही जरांगेबद्दलही काही भाष्य करत नाही. आणि ओबींसीबद्दलही बोलत नाही. सरकारने आधी आपली भुमिका स्पष्ट करावी. सरकारमध्येच मतभेद आहे. हे जास्त गंभीर आहे. महाराष्ट्रात आपण गुंतवणुकीच चौथ्या क्रमांकावर गेलो आहोत. आपण इव्हेंट करणायात इतके मशगुल आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इतका वेळ जातोय की गुंतवणूक महाराष्ट्र यावी यासाठीचे प्रयत्न कमी पडत आहेत. बेरोजगारीचा दर 10.9 इतका झाला आहे. यापेक्षा जास्त बेकारी असणार ही जास्त वाईट आहे. मी कुणाला एकाला जबाबदार ठरविणार नाही. गुंतवणूकदारांना महाराष्ट्रातले वातावरण गुंतवणुक करण्यात चांगले वाटत नसेल. आपल्याकडे गुंतवणुकदाराला हेलपाटे घालावे लागतात, हे थांबवावे लागेल, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2023 3:38 PM IST


