Success Story: 2 मित्रांनी ठरवलं! सकाळी कॉलेज, संध्याकाळी मोमोजचा स्टॉल; आता महिन्याला इतकी कमाई
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
दादरमधील तनिष्क कनोजिया आणि साहिल जाधव या दोन मित्रांनी कॉलेजचे शिक्षण सुरू असतानाच स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे धाडस केले असून त्यांनी सुरू केलेला ‘यारी कट्टा’नावाचा मोमोज स्टॉल अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे.
मुंबई: मुंबईतील दादर परिसरात तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणारी एक यशोगाथा सध्या चर्चेत आहे. दादरमधील तनिष्क कनोजिया आणि साहिल जाधव या दोन मित्रांनी कॉलेजचे शिक्षण सुरू असतानाच स्वत:चा व्यवसाय उभारण्याचे धाडस केले. त्यांनी सुरू केलेला ‘यारी कट्टा’ नावाचा मोमोज स्टॉल अल्पावधीतच महाविद्यालयीन तरूणांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. सध्या तनिष्क आणि साहिल हे दोघेही परळच्या महर्षी दयानंद कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत.
कॉलेज सुटल्यानंतर रोज बाहेर काही ना काही खाण्याची त्यांची सवय होती. या निमित्ताने वेगवेगळे फूड स्टॉल्स पाहताना त्यांच्यात खाद्य व्यवसायाबद्दल विशेष आवड निर्माण झाली. अनेक ठिकाणी मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेले स्टॉल पाहिल्यानंतर “आपणही काहीतरी स्वत:चं सुरू करावं” हा विचार त्यांच्या मनात आला. या विचाराला प्रत्यक्षात उतरवताना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागला. घरच्यांकडून सुरुवातीला नकार मिळाला, शिवाय बरेच दिवस आर्थिक अडचणीही होत्या. मात्र या सगळ्या गोष्टींमुळे खचून न जाता दोघांनीही हार न मानता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवत व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
अखेर काही महिन्यांपूर्वी दादर पश्चिम येथील शिवाजी नाट्य मंदिरासमोर त्यांनी ‘यारी कट्टा’ नावाचा मोमोज स्टॉल सुरू केला. आज या व्यवसायाला 3 ते 4 महिने पूर्ण झाले असून ग्राहकांचा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. कॉलेज सांभाळून पार्ट टाइम सुरू असलेल्या या व्यवसायातून ते दरमहा सुमारे 20 ते 25 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. त्यांच्या स्टॉलवर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमोज उपलब्ध आहेत. पनीर मोमो, वेज मोमो, फ्राईड मोमोज, कुरकुरे मोमोज, चिकन मोमोज अशा विविध प्रकारांमुळे ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे.
advertisement
आपल्या अनुभवाबद्दल बोलताना तनिष्क आणि साहिल म्हणतात की, “एकदा काहीतरी करण्याचं ठरवलं तर तो विचार कृतीत उतरवायलाच हवा. अडचणी येतात, पण चिकाटी ठेवली, तर यश नक्कीच मिळतं.” त्यांच्या ह्या यशाच्या कथेमुळे अनेक तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची नवी उमेद मिळत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 6:27 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Success Story: 2 मित्रांनी ठरवलं! सकाळी कॉलेज, संध्याकाळी मोमोजचा स्टॉल; आता महिन्याला इतकी कमाई










