"100 वर्षांची गोड परंपरा", कल्याणच्या अनंत हलवाईचा रंजक प्रवास, आज सर्वत्र होते एकच चर्चा

Last Updated:

1895 मध्ये अनंत विठ्ठल गवळी यांनी या अनंत हलवाईची स्थापना केली. सुरुवातीला थोडेच पदार्थ इथे मिळत. पण 1914 पासून संपूर्ण मिठाईच्या दुकानात त्यांनी अनंत हलवाई या दुकानाचे रूपांतर केले.

+
अनंत

अनंत हलवाई दुकान कल्याण

पियूष पाटील, प्रतिनिधी
ठाणे : जिल्ह्यातील प्रसिद्ध अनंत हलवाई म्हणजे '100 वर्षांची गोड परंपरा' असे लोक आवर्जून म्हणतात. सण-समारंभ असो वा आयुष्यातील खास क्षण, गोड पदार्थ आणायचे म्हटले कि अनंत हलवाईची निवड ही हमखास केली जाते. इतर वेळी आणि शनिवार-रविवारीही अनंत हलवाई या दुकानात नाष्टासाठी लोक रांगेत उभे असतात.
1895 मध्ये अनंत विठ्ठल गवळी यांनी या अनंत हलवाईची स्थापना केली. सुरुवातीला थोडेच पदार्थ इथे मिळत. पण 1914 पासून संपूर्ण मिठाईच्या दुकानात त्यांनी अनंत हलवाई या दुकानाचे रूपांतर केले. याठिकाणी श्रीखंड, चक्का, गुलाबजाम, बुंदीलाडू मिळत असे. पण नंतर माव्याच्या बर्फी, इतर राज्यातील बर्फी, शेव, गाठी शेव फरसाणचे प्रकार ते ठेवू लागले.
advertisement
अनंत हलवाईमध्ये आजच्या घडीला वेगवेगेगळ्या 132 प्रकारच्या मिठाई मिळतात. तसेच 100 प्रकारचे फरसाण मिळते. त्यांच्या कल्याणमध्ये 5 शाखा आहेत. तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात 19 फ्रेंचाइझी आहेत. मिठाईपुरता ते मर्यादित राहिले नाहीत. काळाप्रमाणे आवश्यक बदल त्यांनी केले. आज त्यांनी अनंत हलवाईचे स्वतंत्र असा कॅफे सुरू केलं आहे. या कॅफेमध्ये फ्रेंच फ्राईज, बर्गर,पिझ्झा सँडविच, गार्लिक ब्रेड, चाट मधले विविध प्रकार मिळतात.
advertisement
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : नारीशक्ती दूत ॲपवरून अर्ज कसा करावा, सोप्या भाषेत संपूर्ण माहिती, VIDEO
आपण समाजात राहतो आणि त्याच समाजाचे आपण देणं लागतो, ही सामाजिक बांधिलकी जपत अनंत हलवाईने 3 शाळा आणि 8 महाविद्यालये स्थापन केली आहेत. शिक्षण ठेच सर्वात श्रेष्ठ दान आहे. आम्ही गरजू तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची अत्यंत गरज आहे, त्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत आणि पुढेही कायम राहू, अशी प्रतिक्रिया अनंत हालवाईचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर प्रफुल गवळी यांनी दिली.
मराठी बातम्या/मुंबई/
"100 वर्षांची गोड परंपरा", कल्याणच्या अनंत हलवाईचा रंजक प्रवास, आज सर्वत्र होते एकच चर्चा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement