Central Railway: आता टेन्शन फ्री कोकण फिरा! मुंबई- सावंतवाडी रोड- चिपळूण मार्गावर धावणार विशेष एक्स्प्रेस; वाचा वेळापत्रक
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नोकरदार कोकणामध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्याचा प्लॅन करीत आहेत. सलग सुट्टीच्या दिवसांमध्ये मुंबई- सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची मागणी प्रवाशांनी केली.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नोकरदारवर्गाला सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे अनेक नोकरदार सुट्ट्यांचा प्लॅन तयार करताना दिसत आहेत. चौथा शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिनच्या दिवशी सोमवार येतोय त्यामुळे अनेकांना सुट्टी आहे. अनेक नोकरदार कोकणामध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्याचा प्लॅन करीत आहेत. सलग सुट्टीच्या दिवसांमध्ये मुंबई- सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची मागणी प्रवाशांनी केली.
सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये नोकरदारांचा सर्वाधिक कल कोकणाकडे असतो. त्यामुळे प्रवाशांची सिंधुदुर्ग, कणकवली आणि रत्नागिरीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी सर्वाधिक गर्दी असते. त्यामुळे फार आधीच इथल्या ट्रेनचे बुकिंग प्रवासी करत असतात. या पार्श्वभूमीवर कोकण विकास समितीने रेल्वे मंडळाकडे, मुंबई- सावंतवाडी रोड, पुणे- सावंतवाडी रोड, मुंबई- चिपळूण या विशेष रेल्वे गाडी चालवण्यात यावी अशी मागणी केली आहे.
advertisement
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या विशेष एक्स्प्रेसच्या डब्यांची रचना स्लीपर, थ्री टायर एसी कोच आणि टू टायर एसी कोच अशी असणार आहे. या स्पेशल ट्रेनला जनरल कोच असणार आहेत की नाहीत, याची माहिती अद्याप कळलेली नाही. या स्पेशल ट्रेनचे दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप या स्थानकांवर थांबे असणार आहेत.
advertisement
पुणे- सावंतवाडी रोड या मार्गावर सुद्धा विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. ह्या विशेष एक्सप्रेसच्या डब्यांची रचना स्लीपर, थ्री टायर एसी कोच आणि टू टायर एसी कोच अशी असणार आहे. ही विशेष एक्स्प्रेस चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कर्जत, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप स्थानकांवर थांबेल.
advertisement
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चिपळूण या स्थानकादरम्यानही आणखी एक विशेष एक्सप्रेस धावणार आहे. या स्पेशल एक्स्प्रेसच्या डब्ब्यांची रचना जनरल सीट असणारे कोच आणि एसी सीट असणारे कोच अशा दोन रचना असणारे डब्बेच असणार आहेत. ही विशेष एक्स्प्रेस दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी या स्थानकावर थांबणार आहे.
advertisement
नियमित धावणाऱ्या एक्स्प्रेसमधील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून या विशेष एक्स्प्रेस चालवल्या जाणार आहेत. शिवाय सुट्ट्यांच्या दिवसांत प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. प्रवाशांच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये सुरक्षित आणि परवडणारा प्रवास उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. शिवाय, भारतीय रेल्वेला या दिवसांमध्ये अतिरिक्त महसूल प्राप्त होणार आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 3:23 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway: आता टेन्शन फ्री कोकण फिरा! मुंबई- सावंतवाडी रोड- चिपळूण मार्गावर धावणार विशेष एक्स्प्रेस; वाचा वेळापत्रक










