Lakshadweep Lok Sabha : शरद पवार यांना मोठा धक्का! विद्यमान खासदाराचा काँग्रेसकडून गेम!
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Lakshadweep Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यश मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला राज्याबाहेर मोठा धक्का बसला आहे.
arad paमुंबई : लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील 48 जागांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. त्यात राज्यातील 48 जागांवर महायुतीला जबरदस्त फटका बसला आहे. मिशन 45 ची घोषणा देणाऱ्या भाजपला निम्म्याही जागा मिळवता आल्या नाहीत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये शरद पवार गटानेही जोरदार यश मिळवलं आहे. अशात शरद पवारांना राज्याबाहेर एका जागेवर मोठा फटका बसला आहे.
महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या लक्ष्वदीपमध्ये NCP शरदचंद्र पवार पक्षाचा पराभव झाला आहे. मोहम्मद फैजल हे शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार होते. मात्र, या जागी फैजल यांचा पराभव झाला आहे. लक्ष्वदीपमधे काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर मोहम्मद फैजल हे शरद पवार गटाच्या बाजूने उभे राहिले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2024 9:01 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Lakshadweep Lok Sabha : शरद पवार यांना मोठा धक्का! विद्यमान खासदाराचा काँग्रेसकडून गेम!