Mumbai : आई-वडिलांच्या सेवेसाठी केअरटेकर ठेवली, पण घात झाला, मुंबईतल्या महिलेवर पश्चातापाची वेळ

Last Updated:

Andheri Jewellery Theft : अंधेरीतील एका महिलेच्या घरातून साडेआठ लाखांचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेले. घरात काम करणाऱ्या केअरटेकरवर संशय असून ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Andheri Jewellery Theft
Andheri Jewellery Theft
मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात सल्लागार म्हणून काम करणाऱ्या एका महिलेच्या घरात मोठी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेच्या घरातून सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. या चोरीप्रकरणी घरात काम करणाऱ्या एका मोलकरणीवर संशय व्यक्त करण्यात आला असून ओशिवरा पोलिसांनी तिच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
संधी साधताच केअरटेकरने केला मोठा घात
तक्रारदार महिला वयाने 45 वर्षांची असून त्या अंधेरीतील लोखंडवाला परिसरात आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांसोबत राहतात. त्या सल्लागार म्हणून काम करत असल्याने घरातील कामासाठी त्यांनी दोन मोलकरणी ठेवलेल्या होत्या. तसेच आईची काळजी घेण्यासाठी रंजना नावाच्या एका महिलेला केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते.
रंजना ही महिला 28 डिसेंबर 2025 रोजी कामावर रुजू झाली होती. तिने सलग दोन दिवस काम केले. त्यानंतर तिच्या घरात निधन झाल्याचे सांगत तिने अचानक कामावर येणे बंद केले. त्यामुळे तिच्यावर कोणालाही सुरुवातीला संशय आला नव्हता.
advertisement
1 जानेवारी रोजी तक्रारदार महिलेच्या वडिलांनी ड्रॉईंग रूममधील दागिन्यांचा बॉक्स उघडून पाहिला. मात्र त्यामध्ये सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी तात्काळ आपल्या मुलीला याबाबत माहिती दिली.
त्यानंतर तक्रारदार महिला घरी आल्यानंतर तिने संपूर्ण बॉक्स तपासला,त्यावेळी सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांना समजले, या घटनेनंतर तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून संशयित मोलकरणीचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : आई-वडिलांच्या सेवेसाठी केअरटेकर ठेवली, पण घात झाला, मुंबईतल्या महिलेवर पश्चातापाची वेळ
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement