IAS Transferred: मनिषा म्हैसकर पाटणकर यांच्यावर मोठी जबाबदारी, मिलिंद म्हैसकर यांचीही बदली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra Ias Transferred: राज्यातील दोन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय जारी करण्यात आले आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात दोन मोठे बदल केले असून बड्या अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या आहेत. ज्येष्ठ सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर पाटणकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या बदल्यांचे निर्णय शुक्रवारी सायंकाळी जारी करण्यात आले.
दोन मोठ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मनिषा म्हैसकर पाटणकर, शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर डॉ. आय. एस. चहल, भाप्रसे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होत असलेल्या जागी केली आहे.
आपल्या जागी श्री. मिलिंद म्हैसकर, भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार श्री. मिलिंद म्हैसकर, भाप्रसे यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार डॉ.आय.एस. चहल, भाप्रसे यांच्याकडून दिनांक ३१.०१.२०२६ रोजी स्वीकारावा.
advertisement
मिलिंद म्हैसकर कोण आहेत?
मिलिंद म्हैसकर हे 1992 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर होती. तसेच गेल्यावर्षी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार त्यांच्यावर देण्यात आला होता.
advertisement
मनीषा म्हैसकर कोण आहे आहेत?
मनीषा म्हैसकर या 1992 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या सनदी अधिकारी आहेत. मनीषा म्हैसकर यांनी जिल्हाधिकारी सांगली, विक्रीकर उपायुक्त मुंबई आणि पालिका आयुक्त अमरावती अशा पदांवर काम केले. त्यानंतर मंत्रालयात महाराष्ट्राच्या माहिती महासंचालक पदावरही त्या कार्यरत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागातही त्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होत्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 6:22 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
IAS Transferred: मनिषा म्हैसकर पाटणकर यांच्यावर मोठी जबाबदारी, मिलिंद म्हैसकर यांचीही बदली








