झोपेत मुंगी चावली वाटलं पण बापाने लेकीच्या गळ्यावरून फिरवला होता ब्लेड, मुंबईत धक्कादायक घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईतील दहिसर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलीच्या गळ्यावरून ब्लेड फिरवला आहे.
संकेत वरक, प्रतिनिधी मुंबई: मुंबईतील दहिसर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलीच्या गळ्यावरून ब्लेड फिरवला आहे. मुलगी झोपेत असताना आरोपी बापाने शांत डोक्याने हा खळबळजनक प्रकार केला आहे. या दुर्दैवी घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार लक्षात येताच आईने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीनं पत्नीवर ब्लेडने वार केले. या हल्ल्यात मायलेकी जखमी झाल्या असून त्याच्यांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हनुमंत सोनवळ असं हल्लेखोर बापाचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
कोर्टातील केसवरून वाद विकोपाला
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत सोनवळ याला आपल्या पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय होता. या संशयावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. दोघांमध्ये अनेकदा मोठे वाद होत असत. या त्रासाला कंटाळून पत्नीने काही दिवसांपूर्वी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
advertisement
रविवारी याच घटस्फोटाच्या केसची माहिती घेऊन पत्नी घरी परतली, तेव्हा हनुमंतने तिला 'कुठे गेली होतीस' अशी विचारणा केली आणि त्यांच्यात पुन्हा जोरदार वाद पेटला. त्यांची मुलगीही सतत आईची बाजू घेत असल्याने आरोपी हनुमंतच्या मनात तिच्याबद्दलही राग खदखदत होता.
रात्री २ वाजता हल्ला
याच विकृत भावनेतून त्याने रविवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास हे भयंकर कृत्य केले. मुलगी झोपेत असताना त्याने तिच्या गळ्यावर ब्लेड फिरवला. मुलीला सुरुवातीला मुंगीने चावल्यासारखे वाटले, पण खाजवत असताना रक्त येत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने लगेच आरडाओरडा सुरू केला.
advertisement
लेकीचा आरडाओरडा ऐकून आईला जाग आली आणि ती मुलीला वाचवण्यासाठी धावली. तेव्हा संतापलेल्या हनुमंतने तिच्यावरही ब्लेडने हल्ला करत पोटावर वार केला. इतकेच नव्हे, तर मायलेकींना वाचवण्यासाठी धावलेल्या शेजारच्या लोकांनाही त्याने "मी तुम्हाला बघून घेईन," अशी धमकी दिली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मायलेकींवर सध्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी हनुमंत सोनवळला बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 12:42 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
झोपेत मुंगी चावली वाटलं पण बापाने लेकीच्या गळ्यावरून फिरवला होता ब्लेड, मुंबईत धक्कादायक घटना


