Mumbai : धारावी-माहीम स्थानकाजवळ झोपडपट्टीला आग, उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत

Last Updated:

Mumbai Fire Dharavi : मुंबईच्या माहीम भागात आग लागली असून अद्याप आटोक्यात आलेली नाही. अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

News18
News18
मुंबई : मुंबईच्या धारावी-माहीम दरम्यान रेल्वे ट्रॅक जवळ आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्याने उपनगरीने रेल्वे सेवा विस्कळीत झालेली असून अजूनही ही आग आटोक्यात आलेली नाही. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सध्या ही आग मुंबईच्या धारावी-माहीम दरम्यान रेल्वे ट्रॅक जवळ लागलेली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. शिवाय अग्निशमन दलाचे जवान प्रचंड शर्तीचे प्रयत्न करत आहेत. तरीसुद्धा वाऱ्याच्या वेगामुळे आग अधिक वेगाने पसरत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक जणांनी आपल्या घरातून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
अग्निशमन दलाचे अधिकारी म्हणाले की, ''सध्या ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली असून आम्ही प्रत्येक शक्यतो मार्ग वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, ही परिस्थिती गंभीर आहे आणि नागरिकांनी परिसरातून लांब राहावे.'' जवळपासच्या रस्त्यांवर वाहतूकही ठप्प झाली असून पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सुचना देखील दिलेल्या आहेत. धक्कादायक म्हणजे काही लोक आग पाहण्यासाठी घटनास्थळी जमले आहेत
advertisement
विशेष म्हणजे ही लागलेली आग फक्त त्या परिसरापूर्ती मर्यादित न राहता जवळपासच्या परिसरातही पसरण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाने अतिरिक्त गाड्या मागवल्या आहेत आणि हवेतूनही ड्रोनद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : धारावी-माहीम स्थानकाजवळ झोपडपट्टीला आग, उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement